भिजवलेले आणि भाजलेले चणे खाण्याचे फायदे
निरोगी आरोग्यासाठी चणे खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. चण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स आणि आयन आढळून येते जे आरोग्यासाठी गुणकारी आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, रोजच्या आहारात ५० ते ६० ग्रॅम चण्याचे सेवन केल्याने आपले शरीर निरोगी राहते. पण अनेकदा काहींना असा प्रश्न पडतो की भिजलेले चणे खावे की उकडलेले चणे खावे? याबद्दल आम्ही आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. नियमित चण्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.( फोटो सौजन्य- istock)
भाजलेले चणे खायला अनेकांना आवडत. या चण्यामध्ये प्रोटीन असते. त्यामुळे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी भाजलेले चणे खाऊ शकता. मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी रोजच्या आहारात चण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. तसेच चण्याचे सेवन केल्यामुळे हृद्यासंबंधित समस्या उद्भवत नाहीत.
भिजवलेल्या चण्यांमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. चण्यांना मोड आल्यानंतर त्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. तसेच मोड आलेल्या चण्यांमध्ये भरपूर प्रोटीन असते, जे मसल्ससाठी चांगले आहे. तसेच यामुळे डायजेशनची समस्या उद्भवत नाही.
चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषण असते. तसेच यामध्ये आर्यन असल्याने शरीरात रक्ताची कमतरता असल्यास तुम्ही भाजलेले किंवा उकडलेले चणे खाऊ शकता
रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास सकाळी उठल्यावर एक मूठ चणे घेऊन त्याच्यासोबत गूळ खावे.
हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी नियमित चण्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून मधुमेह नियंत्रित होतो.
चण्यांमध्ये असलेल्या कॅल्शियम, पोट्याशियममुळे गुल्कोज नियंत्रणात राहतो.
चण्यांचे सेवन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करू शकता. तसेच चण्यांसोबत गूळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. चणे खाल्ल्याने जास्त भूक लागत नाही. यामुळे पोट देखील भरलेले राहते. त्यामुळे सकाळच्या वेळी चणे खाल्ल्याने आरोग्याला अधिक फायदे होतात. वजन कमी किंवा वाढवायचे असल्यास तुम्ही चणे खाऊ शकता. रात्रीच्या जेवणात चण्यांचे सेवन केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते.