Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हळद पावडरपेक्षा कच्ची हळद अधिक प्रभावी, आहारात समावेश केल्यास आरोग्याला होतील ‘हे’ फायदे

.हळदीमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. जेवणातील पदार्थांमध्ये हळद टाकली नाही तर जेवणात काहीतरी नसल्यासारखे वाटते.जेवणात किंवा इतर ठिकाणी कच्च्या हळदीचा वापर न करता हळदी पावडर वापरली जाते. भारतीय स्वयंपाक घरात हळद हा मसाल्यातील पदार्थ असतोच.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 11, 2024 | 02:30 PM
कच्च्या हळदीचे फायदे

कच्च्या हळदीचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

जेवणाची चव वाढवण्यासाठी जसा मीठाचा वापर केला जातो तसाच वापर हळदीचा सुद्धा केला जातो. जेवणाची चव आणि रंग वाढवण्यासाठी हळद फायदेशीर आहे.हळदीमध्ये अनेक गुणकारी गुणधर्म आढळून येतात. जेवणातील पदार्थांमध्ये हळद टाकली नाही तर जेवणात काहीतरी नसल्यासारखे वाटते.जेवणात किंवा इतर ठिकाणी कच्च्या हळदीचा वापर न करता हळदी पावडर वापरली जाते. भारतीय स्वयंपाक घरात हळद हा मसाल्यातील पदार्थ असतोच.

हळदीचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, तसाच वापर औषधासाठी देखील केला जातो. पायाला सूज आल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर सगळ्यात आधी हळद लावण्याचा सल्ला दिला जातो. जखमेवर हळद लावल्यानंतर जखम लवकर बरी होते. मागील अनेक शतकांपासून हळदीचा वापर केला जात आहे. आयुर्वेदामध्ये हळदीला विशेष महत्व आहे. हळदीच्या पावडर सोबतच कच्च्या हळदीचा देखील आहारात समावेश केल्यास आरोग्याला फायदे होतील. कच्ची हळद हळदीच्या पावडरपेक्षा अधिक प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया कच्च्या हळदीचे फायदे.(फोटो सौजन्य-istock)

कच्च्या हळदीचे फायदे:

हळदीची चव आणि सुगंध:

कच्च्या हळदीचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. कच्ची हळद सुंगंधी आणि चवीला अधिक सुंदर असते. यामुळे जेवणाची चव वाढण्यास मदत होते. अजूनही अनेक स्वयंपाक घरांमध्ये कच्च्या हळदीचा वापर केला जातो. कच्च्या हळदीला पावडरच्या हळदीपेक्षा अधिक सुगंध असतो.

कच्च्या हळदीचे फायदे

नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध:

कच्च्या हळदीमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आढळून येतात. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी गुणकारी ठरतो. हळदी पावडर तयार करताना हळदीमधील आवश्यक गुणधर्म निघून जातात. कच्च्या हळदीला असलेला वास हळदी पावडरला येत नाही. कच्ची हळद वाळवल्यामुळे आणि दळल्यामुळे त्यातील टिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स नष्ट होऊन जातात.

हळदीमधील तेल नष्ट होते:

कच्च्या हळदीमध्ये असलेले तेल हळद दळण्याच्या प्रक्रियेमुळे नष्ट होऊन जाते. हळदीमध्ये अटलांटोन असते, जे औषधांसाठी प्रभावी आहे. कच्च्या हळदीपासून पावडर तयार करताना त्यातील आवश्यक सर्व घटक, हळदीची चव, सुंगंध, रंग निघून जातो.

कच्च्या हळदीचे फायदे

पोषक तत्वांनी समृद्ध:

कच्ची हळद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे हळदीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि आवश्यक तेलांसह अनेक पोषक घटक आढळून येतात. जे शरीर, त्वचा, केसांसाठी गुणकारी आहे. कच्च्या हळदीवर प्रक्रिया केल्यानंतर त्यातील संयुगे बदलून जातात.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of raw turmeric turmeric powder halad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 02:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.