
फोटो सौजन्य: Freepik
सगळ्यांनाच वाटते की आपला चेहरा सुंदर असावा, चार चौघात तो उठून दिसावा. यासाठीच ना जाणो किती तरी लोशन, फेसवॉश आपण आपल्या घरी आणत असतो. पण आपल्या सुंदर चेहऱ्याला नजर लागते ती पिंपल्स आणि ओपन पोर्सची. चेहऱ्यावर असणाऱ्या बारीक छिद्रांना इंग्लिशमध्ये ओपन पोर्स म्हणतात.
सध्या चेहऱ्यावर ओपन पोर्स दिसणे ही एक सामान्य समस्या बनली आहे, ज्यामुळे आपल्या जीवनात कोणताही धोका नसला तरी त्याचा आपल्या आत्मविश्वासावर नक्कीच परिणाम होतो. अनेक जणं हे चेहऱ्यावरील छिद्र घालवण्यासाठी अनेक क्रीम वापरात असतात पण काही वेळा यातून काहीच निष्पन्न होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही अशा फेस पॅक बद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ओपन पोर्स नक्कीच कमी होतील.
हा फेस पॅक तयार करण्यासाठी २ चमचे मुलतानी माती आणि एक चमचा गुलाबजल घ्या. ते चांगले मिसळा आणि पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. फेस पॅक कोरडा झाल्यानंतर नॉर्मल पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून टाका. मुलतानी माती हे तेल शोषून घेण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखले जाते, जे चेहऱ्यावरील छिद्र बंद करण्यास आणि त्वचा घट्ट करण्यास मदत करते. गुलाबपाणी त्वचेला शांत करते आणि जळजळ कमी करते.
एक पिकलेला टोमॅटो घ्या आणि त्याला बारीक करा. आता ते चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटांनी तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा. टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचा गुणधर्म असतो जो चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यास मदत करतात.
दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. दोन्ही चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील हे आवरण 15 ते 20 मिनिटे राहूद्या व नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. मधामध्ये असणारा गुणधर्म त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करते, तर लिंबाचा रस छिद्रांना घट्ट करण्यास आणि त्वचा चमकण्यास मदत करते.
२ टेबलस्पून एलोवेरा जेल आणि १ टेबलस्पून काकडीचा रस घ्या. एलोवेरा जेल आणि काकडीचा रस मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा व 15-20 मिनिटे असेच सोडा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. कोरफड त्वचेला शांत करते आणि मॉइश्चरायझ करते, तर काकडीचा रस चेहऱ्यावरील छिद्र बंद करण्यास आणि त्वचेला ताजेतवाने करण्यास मदत करतो.