फोटो सौजन्य: iStock
आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, जी व्यक्ती फक्त आपल्यावर जीवापाड प्रेम करते — ती व्यक्ती म्हणजे *आई*. आपल्या आयुष्यातील सर्व सुख तिला मिळावीत, ही प्रत्येक मुलाची मनापासूनची इच्छा असते. कौसल्येचा राम, यशोदेचा कृष्ण आणि जिजाऊंचा शिवबा, अशी कितीतरी उदाहरणं आहेत जी आपल्याला आई-मुलाचं नातं किती अद्वितीय असतं हे सतत सांगत असतात.
आज मातृदिन म्हटलं की अनेक जण आईला गुलाबाचे फुल देतात, तर काहीजण तिला फिरायला घेऊन जातात. पण आजही असे काही लोक आहेत ज्यांना आपले *आईवरील प्रेम* कवितेच्या माध्यमातून व्यक्त करावेसे वाटते.जर तुम्हालाही तुमच्या आईसाठी एखादी छानशी कविता ऐकवायची असेल, तर आज आपण अशाच काही सुंदर कविता जाणून घेणार आहोत.
माया ममता भरूनी जीव लावते आई
नाही जगात कोठे अशी दूसरी ममताई.
मंदिराचा कळस दिसावा तशी आईची ख्याति
अंगणातिल तुळशी प्रमाणे संभाळते घराची नाती
प्रेमस्वरूप तुझे वासतलय तुझी स्मृति मनात ठाई
घराघरात दारादारात तुझे स्मरणा होते आई..
वृक्ष जसे उन्हात न्हाउनी सर्वास साउली
तसे मनी दुख झेलुनी सुख देते माउली
देवाचेही भान हरपते तुझ्या ममते पाई
हात जोडून देव म्हणे तुला शरण गे आई…
Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त आपल्या आईला गिफ्ट करा हे Useful Gadgets, मदर्स डे होईल खास
अर्थहिन् जीवन होता तूच देते वैभव माया
तुझ पाहून या धरतीची सुखलोलुप झाली काया
तुझ पाहून वेदना साऱ्या अडगळीत लपून जाई
भकू ही तुझ्या प्रेमाची शांत ना होणार आई.
गुंतलेले तुझे हात नेहमी असतात कामात तुझी अंगाई
एकवयास चंद्र घेऊन येई रात
स्वप्न एक ठरावे खरे पुढल्या जन्मी मिळवी पुण्याई
तुझ्याच पोटी यावा जन्म हीच आस मोठी आई…