फोटो सौजन्य: thebetterindia (Instagram)
असे म्हणतात की जगाची निर्मिती करणाऱ्या देवाने माणसाला घडवताना त्याला त्याच्यासारखे डोळे दिले, कान दिले, विचार करण्यास चांगली बुद्धी दिली. पण या सर्वात एक गोष्ट देवाने मानवाला दिली नाही. ते म्हणजे अमरत्व. असे असूनदेखील, देवाने मानवाला अशी एक गोष्ट दिली, जी त्यांनादेखील अनुभवता येत नाही. ती गोष्ट म्हणजे आईची माया !
मातृदिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवसानिम्मित अनेक जण सोशल मीडियावर आपल्या आईचे फोटोज आणि तिच्याविषयीच्या कविता शेअर करतात. पण दुसरीकडे अशी ही अवस्था पाहायला मिळते जिथे मुलं आपल्या आई-वडिलांना वृद्धश्रमात सोडून जातात. या काळात आज आपण एका व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या आईला 2001 च्या Bajaj Chetak scooter मॉडेलवरून 92,822 किमीची सफर घडवून आणली आहे.
आपल्या पुराण कथेत श्रावण बाळाचा उल्लेख नेहमी केला जातो. जिथे श्रावण बाळ आपल्या वृद्ध आणि आंधळ्या आई वडिलांना तीर्थयात्रेवर घेऊन जातो. आज कृष्ण कुमार यांची कथा वाचल्यावर तुम्हाला त्याच श्रावण बाळाची आठवण येईल.
2018 साली कृष्ण कुमार यांनी जॉब सोडला. सेव्हिंग अकाउंट मधील रक्कमेच्या साहाय्याने दिवंगत वडिलांच्या जुन्या बजाज चेतकवर त्यांनी ‘मातृ सेवा संकल्प यात्रा’ ची सुरुवात केली. ही एक अनोखी यात्रा होती, जी कृष्ण कुमार यांनी आपल्या आईसाठी योजली होती. ज्या माउलीने घराचे उंबरठे कधी ओलांडले नाहीत, तिलाच जग दाखवायचं असा निर्धार करत कृष्ण कुमारने आपल्या आईला 94,000 किमीची तीर्थयात्रा घडवली. यात, केदारनाथ ते कन्याकुमारी, भूतानचे मठ ते म्यानमारच्या जंगलांपर्यंतचा समावेश आहे. या तीर्थयात्रे दरम्यान असंख्य दिवस कृष्ण कुमार आणि त्यांच्या आईने मंदिरात, बस स्टॉप, आणि गुरुद्वारात घालवले.
वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ, दीर्घकाळ खोकला ठरू शकते दम्याचं लक्षण
ज्या आईने मला सर्वस्व दिले, तिला मला हे जग दाखवायचं आहे. या शब्दांवरून समजते कृष्ण कुमार यांचे आपल्या आईवर किती प्रेम आहे.