Mother's Day 2025: मातृदिनानिमित्त आपल्या आईला गिफ्ट करा हे Useful Gadgets, मदर्स डे होईल खास
दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जाणार आहे. यंदाही 11 मे रोजी मातृदिन सादर केला जाणार आहे. हा दिवस आपल्या आईला समर्पित आहे. हा दिवस त्या सर्व मातांना समर्पित आहे ज्या निस्वार्थ प्रेम, त्याग आणि आपुलकीचे प्रतीक आहेत. हा दिवस आपल्या आईसाठी आणखी खास बनवण्यासाठी अनेक कल्पना वापरल्या जातात. हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी व्हॉट्सअॅप स्टेटसवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जातात.
मातृदिन आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला काही खास गिफ्ट देखील देऊ शकता. काही असे गिफ्ट्स जे तुमच्या आईला रोजच्या जीवनात फायदेशीर ठरतील, शिवाय हे गिफ्ट तुमच्या आईच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आणेल. या मदर्स डे ला, तुमच्या आईला असे काहीतरी भेट द्या जे तिचे काम सोपे करेल आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. आता, आम्ही तुम्हाला अशा काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत जे वापरण्यास सोपे आहेत आणि तुमच्या आईला आनंदी करतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
एखाद्या व्यक्तिला स्मार्टवॉच गिफ्ट करणं काही नवीन कल्पना नसली, तरी स्मार्टवॉच हे एक युजफूल गॅझेट आहे. नावाप्रमाणेच यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत केली जाते. स्मार्टवॉचमध्ये स्टेप्स काउंट, हार्ट रेट, फॉल डिटेक्शन आणि स्लीप मॉनिटरिंग असे अनेक खास फीचर्स दिले जातात, ज्यामुळे तुमच्या आईला तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या आईलाही डिजिटल स्मार्टवॉच पाहून आनंद होईल.
जर तुमची आई शिक्षिका असेल किंवा तिला पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर ई-रीडरपेक्षा दुसरं चांगलं गिफ्ट असूच शकत नाही. या मदर्स डेला तुम्ही तुमच्या आईला किंडल पेपरव्हाइट किंवा कोबो क्लारा भेट देऊ शकता. या गॅझेटमध्ये एकाच ठिकाणी वेगवेगळी पुस्तके मिळतील. हे तुमचं स्मार्ट ग्रंथालय देखील बनू शकतं. या गॅझेटमध्ये अशी देखील सेटिंग आहे, ज्याच्या मदतीने डोळ्यांवर जास्त तणाव येत नाही.
तुम्ही तुमच्या आईला रोबोट व्हॅक्यूम क्लिनर भेट देऊ शकता. घरात साफसफाई करण्यात आईचा संपूर्ण दिवस निघून जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आईला रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भेट दिला, तर तुमची आई नक्कीच आनंदी होईल. यामध्ये तुम्हाला फक्त वेळ सेट करायची आहे, त्यानंतर हे क्लीनर आपोआप फरशी स्वच्छ करतील. अनेक रोबोट व्हॅक्यूम क्लीनरमध्ये मोबाईल ऑपरेशन फीचर्स देखील असतात. ज्यामुळे तुम्ही ते मोबाईलवरून ऑपरेट करू शकता.
सध्याच्या या डिजीटल जगात तुमच्या आईसाठी सर्वोत्तम गिफ्ट म्हणजे नवीन स्मार्टफोन. स्मार्टफोन आपल्याला केवळ कॉलिंग आणि चॅटिंगसाठीच नाही तर इतर अनेक कामांसाठी फायदेशीर ठरू शकतो. स्मार्टफोनचे फायदे असंख्य आहेत.