बाजारामध्ये मिळणारे निळ्या रंगाचे फळ हे आरोग्यासाठी गुणकारी आहे. या निळ्या फळाला ब्लूबेरी (Blueberry) असे बोलतात. चवीला आंबट गोड असणारे फळ आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर आहे. या फळाला बरेच लोक ‘नीलबद्री’ असे देखील बोलतात. ब्लूबेरीचे उत्पादन युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेमध्ये घेतले जाते. इतर फळांच्या तुलनेत हे फळ महाग असले तरी आरोग्यासाठी भरपूर गुणकारी आहे. ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, मँगनीज, फायबर आढळून येते. तसेच हे फळ अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. मात्र अजूनही ब्लूबेरीचे फायदे अनेकांना माहित नाहीत. चला तर जाणून घेऊया ब्लूबेरी खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.
ब्लूबेरीचे फायदे:
वजन कमी करण्यास मदत करते:
वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण हैराण झाले आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही आहारात ब्लूबेरीचा समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होईल. यामध्ये कमी कॅलरीज असतात.तसेच भरपूर फायबरअसते. यामुळे लवकर वजन वाढत नाही. ब्लूबेरीचे सेवन केल्यानंतर पोट भरलेले राहते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. यामध्ये अँथोसायनिन नावाचा पोषक घटक आढळतो.
[read_also content=”सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी ‘हे’ पदार्थ नक्की बनवून पाहा https://www.navarashtra.com/lifestyle/make-a-quick-recipe-for-breakfast-538282.html”]
मेंदूसाठी फायदेशीर:
ब्लूबेरीमध्ये असलेले गुणकारी घटक मेंदूसाठी फायदेशीर आहेत. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सअसतात जे मेंदूसाठी गुणकारी आहेत. तणाव कमी करण्यासाठी आहारात ब्लूबेरीचा समावेश करावा. ब्लूबेरीमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोन्यूट्रिएंट्स मध्यवर्ती मज्जासंस्था निरोगी ठेवण्यास उपयोगी आहेत.
त्वचा निरोगी राहते:
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. हे उपाय काहीकाळ आपल्या त्वचेवर ग्लो टिकवून ठेवतात. पण कालांतराने त्वचा पुन्हा पहिल्यासारखी होते. त्यामुळे त्वचेला आतून पोषण देणे गरजेचे आहे. ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि अनेक आश्चर्यकारक गुणकारी घटक आढळून येतात. यामुळे त्वचा निरोगी राहून त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते.
[read_also content=”नवरीचा चेहरा खुलेल अधिक, केशराचा वापर करून बनवा घरगुती क्रिम https://www.navarashtra.com/lifestyle/make-saffron-face-cream-at-home-538241.html”]
पचनक्रिया सुधारते:
ब्लूबेरीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. ब्लूबेरी खाल्ल्याने पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी आणि अपचन दूर होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लूबेरीचे सेवन केले पाहिजे. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ब्लूबेरी उपयुक्त आहे. याचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. ब्लूबेरीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे जळजळ कमी होऊन आरोग्यसंबंधित समस्या कमी होतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.