फोटो सौजन्य: Freepik
आजच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे हाय ब्लड प्रेशर ही एक साधारण समस्या बनली आहे, जी झपाट्याने वाढत आहे. हाय ब्लड प्रेशर होण्याआधीचे आयुष्य आणि ते झाल्यानंतरचे आयष्य पूर्णपणे वेगळे असते. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांना आपल्या अनेक सवयीत बदल करावे लागतात, खासकरून आहारात. पण जेव्हा वेळ रक्तदानाची येते तेव्हा एक प्रश्न आवर्जून विचारला जातो तो म्हणजे हाई ब्लड प्रेशर रुग्ण रक्तदान करू शकतात का? चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
रक्तदान हे एक चांगले कार्य आहे, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकते. जर तुमचे ब्लड प्रेशर नियंत्रणात असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता. रक्तदान केंद्रात तुमचे ब्लड प्रेशर आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात. सर्व काही ठीक असल्यास, आपण रक्तदान करू शकता. जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त असला तरीही तुम्ही रक्तदान करू शकता, फक्त अशेवेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे.
स्टेबल ब्लड प्रेशर: जर तुमचा रक्तदाब नियंत्रणात असेल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सामान्य औषधांनी नियंत्रित होत असेल, तर साधारणपणे रक्तदान करण्यात कोणतीही अडचण येत नाही.
रक्तदान करण्यापूर्वी तपासणी: रक्तदान केंद्रावर तुमचे ब्लड प्रेशर आणि इतर महत्त्वाच्या बाबी तपासल्या जातात. जर तुमचा बीपी नॉर्मल असेल तर तुम्ही रक्तदान करू शकता.
औषधांचा परिणाम: जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरसाठी औषधे घेत असाल तर या औषधांचा तुमच्या रक्तदानावर परिणाम होत आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. बहुतेक केसेसमध्ये, औषधांचा रक्तदानावर परिणाम होत नाही.
आरोग्याची काळजी: तुम्हाला नुकताच कुठला मोठा आजार किंवा समस्या झाली असेल तर रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
महत्वाची सूचना: रक्तदान करण्याआधी व केल्यानंतर चांगल्या प्रमाणात पाणी प्या. रक्तदानाचे कार्य यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर आराम करा व भारी शारीरिक काम करणे टाळा.