Shravan: गरोदरपणात महिलांना उपवास करता येईल? 'या' गोष्टी ध्यानात असूद्यात
श्रावण महिना अखेर सुरु झाला आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकरला समर्पित केला जातो. हिंदू धर्मात या महिन्याला फार महत्तव आहे. या महिन्यात अनेकजण पूजा-अर्चा करत उपवास करतात. या महिन्यात देवाची पूजा करत उपवास केल्याने देवाची सदैव आपल्यावर कृपा राहते आणि आपल्या मनो-इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. या महिन्यात विशेष करून महिलावर्ग उपवास करत असतात. मात्र गरोदर महिलांनी याकाळात उपवास करायला हवा का? तसेच या काळात कशाप्रकारे गरोदर महिलांना उपवास करता येईल? याविषयी सविस्तर माहिती आज आम्ही सांगत आहोत.
गर्भवती महिलांना उपवास करण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण या काळात गरोदर महिला आणि त्यांच्या पोटातील बाळाला भरपूर पोषण आवश्यक असते. अशा परिस्थितीत महिलांनी पोषणाची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळेच डॉक्टारदेखील गर्भवती महिलांना कधीही उपवास करण्याचा सल्ला देत नाहीत.
हेदेखील वाचा – वॅक्सिंग केल्यानंतर चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकते त्वचेचे गंभीर नुकसान
जे लोक श्रावणात किंवा इतर वेळी उपवास करतात, त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. विवाहित महिला खास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. काही महिला दिवसभर अन्न-पाणी न घेता श्रावणातील कठीण उपवास करतात. तुम्ही गरोदरपणात उपवास करत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
खरं तर उपवास करणं हे गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिला दोघांसाठीही योग्य नाही. मात्र तरीही जर तुम्ही उपवास करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या. तुम्हाला जर साधे पाणी पिण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही नारळ पाणी, दूध, रस, लस्सी यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.
उपवास करताना बहुतेक लोक भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात चहा किंवा कॉफीचे सेवन करतात. गरोदर असताना असे करणे हानिकारक असू शकते. चहा आणि कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास डिहायड्रेशन, ॲसिडिटी आणि गॅस अशा समस्या निर्माण होऊ शकतात.