फोटो सौजन्य: iStock
आयुष्यातील अनेक सुंदर क्षणांपैकी एक क्षण म्हणजे आई होणे. पण आई होताना महिलांना अनेक गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते. जर एखादी महिला पहिल्यांदाच गरोदर असेल तर त्या स्वतः काही वेळेस गोंधळात असतात. हल्ली अनेक महिला आपल्या आरोग्याला सुद्धा प्राधान्य देताना दिसतात. वेळेवर जेवण, योग्य डाएट, आणि उत्तम आहाराकडे त्या विशेष लक्ष देत आहे.
अनेकदा एक प्रश्न नकीच प्रेग्नन्ट महिलेकडून विचारला जातो तो म्हणजे प्रेग्नन्सी दरम्यान व्यायाम करू शकतो का? खरेतर प्रेगनन्सी व्यायाम करायचा की नाही हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. काही स्त्रियांसाठी, डॉक्टर बेड रेस्टचा सल्ला देतात तर काहींसाठी ते म्हणतात की व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
महिला गर्भधारणेच्या कोणत्याही त्रैमासिकात व्यायाम सुरू करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सवय जपणे. सुरुवातीला हलका व्यायाम करा. गरोदरपणात तुम्ही नेहमीच सोपे व्यायाम करावेत. तसेच एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरला सुद्धा याबाबत विचारावे.
तुमच्या शरीराचे ऐका: तुम्हाला चक्कर आल्यास, थकल्यासारखे वाटत असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा हृदयाचे ठोके जलद होत असल्यास व्यायाम करणे थांबवा.
हायड्रेटेड राहा: व्यायाम करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. जेणेकरून तुम्ही हायड्रेट राहाल.
जास्त गरम होणे टाळा: उष्ण किंवा दमट हवामानात व्यायाम करू नका.
जास्त थकवा येऊ देऊ नका: थकवा येईपर्यंत व्यायाम करू नका. यामुळे तुम्हालाच याचा त्रास होईल.
कमी वजन निवडा: जर तुम्ही वेट लिफ्ट करत असाल तर कमीत कमी वजन वापरा.
मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिणे टाळा; करा ‘या’ चहाचे सेवन
स्क्वाट: नॉर्मल डिलिव्हरीमध्ये हा खूप चांगला ऑप्शन आहे. हा व्यायाम केल्याने पेल्विक मसल्स लवचिक होतात. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होते. हा व्यायाम करण्यासाठी, आपण भिंतीचा आधार देखील घेऊ शकता.
किगल: सामान्य प्रसूतीसाठी केगल व्यायाम हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे पेल्विक स्नायू लवचिक होतात. तसेच गर्भधारणेदरम्यानचा ताण कमी होतो.
योग आणि मेडिटेशन: योग आणि मेडिटेशनमुळे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत होतात. हे मनाला आराम देण्याचे काम करते. यामुळे तणावही कमी होतो. यामुळे पाठदुखी आणि चिंता दूर होते.
वॉकिंग: ज्या महिला गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात आहेत त्यांनी अर्धा तास चालणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचे स्नायू मजबूत होतात. या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.