फोटो सौजन्य - Social Media
गूळ साखरेपेक्षा फायदेशीर मानला जातो. गुळात आढळून येणारे गुणतत्व शरीरासाठी फायद्याचे असतात. पण प्रत्येक शरीरसाठी नव्हे. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना गुळाचा चहा पिणे कठीण ठरू शकते. मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिणे टाळावे. गूळ हा शेवटी गोड पदार्थ असतो. गुळाचा चहा प्रत्येकाने पिणे योग्य नाही आहे. जर तुमच्या रक्तात साखार जास्त आहे तर गुळाचा चहा पिणे आतापासूनच टाळा. गुळाचा प्रभाव हा उष्ण असतो. याचे सेवन केल्यास शरीरात उष्णता तर वाढते, त्याचबरोबर रक्तातील साखरही वाढते. परिणामी, मधुमेहाच्या आजाराला कारणीभूत ठरतो.
जर तुम्ही मधुमेहाचे शिकार झाले आहात. तर तुम्ही गुळाच्या चहाऐवजी इतर प्रकारचे चहा पिऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात, मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम चहा कोणती?
हर्बल चहा (Herbal Tea):
हर्बल चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक चांगला पर्याय आहे. हा चहा कॅफीनमुक्त असतो आणि शरीराला हायड्रेट ठेवतो. यामध्ये दालचिनी, तुळस, आलं, आणि हळद अशा औषधी वनस्पतींचा समावेश असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याचा रोज सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
ग्रीन टी (Green Tea):
ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामध्ये उपस्थित असलेले Catechins हृदयविकाराचा धोका कमी करतात आणि चयापचय सुधारतात. ग्रीन टी हळूहळू वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.
लेमनग्रास टी (Lemongrass Tea):
लेमनग्रासमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हा चहा शरीराला आरामदायक वाटण्यासाठी उपयुक्त आहे. लेमनग्रास चहाचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
चहा तयार करताना घ्यायची काळजी
इतर फायदेशीर पर्याय
ब्लॅक टी (Black Tea):
ब्लॅक टीमध्ये असणारे पॉलिफिनॉल्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरा चहा फार फायदेशीर मानले जाते.
जिंजर टी (Ginger Tea):
आलं हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याने पचन सुधारते आणि साखरेचा स्तर संतुलित राहतो. हिवाळ्याच्या दिवसात आल्याचा चहाचा आस्वाद नियमित घ्यावे. खासकरून मधुमेहाच्या रुग्णांनी हा आस्वाद नक्की घ्यावा.