कितीही मेकअप करा किंवा चांगले कपडे घाला पण जर आपले केस नीट नसतील तर चेहऱ्याचे सौंदर्य कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. केस हे कोणत्याही महिलेसाठी तिच्या सौंदर्याचा एक महत्त्वापूर्ण भाग असतो. आपले सौंदर्य वाढवण्यात आपले केस महत्तवाची भूमिका बजावत असतात. आपले केस सुंदर, घनदाट आणि चमकदार असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र आताच्या काळात अनेकजण केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या वाढत चाललेले प्रदूषण, बदलते वातावरण आणि चुकीच्याजीवनशैलीमुळे आपल्या केसांची काळजी घेणे थोडे आव्हानात्मक झाले आहे.
सध्या थंडीचा ऋतू सुरु आहे या ऋतूत केसांच्या समस्येने प्रामुख्याने फार वाढतात. कोंडा, केसगळती अशा अनेक केसांच्या समस्या महिलांसमोर येऊन उभ्या असतात. बाजारात या समस्यांना दूर करण्यासाठी अनेक नवनवीन प्रोडक्टस उपलब्ध आहेत मात्र बऱ्याचदा हे प्रोडक्टस महाग आणि रसायनयुक्त असतात जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरत असतात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी केसांच्या समस्या दूर करण्यासाठी एक रामबाण घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या घरात उपलब्ध असलेल्या चहा पावडरचे पाणी केसांच्या समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. केसांसाठी याचा कसा वापर करावा ते जाणून घ्या.
Korean Glass Skin मिळवण्यासाठी 5 स्किन केअर टिप्स फॉलो करा, महागडे प्रोडक्टस खरेदी करण्याची गरज नाही
साहित्य
बनवण्याची पद्धत
लांबलचक-दाट अन् सुंदर काळ्या केसांसाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये या 6 नैसर्गिक गोष्टींचा समावेश करा
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त
चहा पत्तीच्या पाण्यामध्ये पॉलीफेनॉल्स नावाचे घटक असते जे स्कॅल्पवरील इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते. स्कॅल्पला आवश्यक पोषण मिळाल्यामुळे केस मजबूत होतात आणि आपोआप केसगळती थांबू लागते. चहा पत्तीच्या पाण्याचा आठवड्यातून दोनदा वापर केल्याने टाळूवरील सूज कमी होते आणि यामुळे केस वाढण्यास मदत मिळते.
केसांना नैसर्गिक मॉइश्चराइझ मिळते
चहाच्या पत्तीत मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 5 असते,ज्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि यामुळे केसांचे मॉइश्चराइझ होते. यामुळे केस मऊ होतात. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने हे केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. यामुळे कोरड्या आणि नितेज केसांमध्ये चमक येऊ लागते आणि ते व्यवस्थित दिसू लागतात.