विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा 'या' भाज्यांचे सेवन:
शरीरात जीवनसत्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यातील शरीराला आवश्यक असलेले विटामिन्स म्हणजे विटामिन बी 12. विटामिन बी 12 ची शरीरात कमतरता निर्माण झाल्यानंतर सतत अशक्तपणा जाणवणे, थकवा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात पौष्टिक आणि पचनास हलके असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास सांधेदुखी, रक्तवाहिन्या फुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. अशावेळी दैनंदिन आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन बी 12ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
भेंडी ही भाजी सगळ्यांचं आवडते. दैनंदिन आहारात भेंडीचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. या भाजीमध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात भेंडीचे सेवन करावे. यामुळे शरीरातील हाडांना अनेक फायदे होतात. सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात भेंडीचे सेवन करावे. भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक आढळून त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुम्ही भेंडीच्या भाजीचे सेवन करू शकता. शरीरात निर्माण झालेली पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी भेंडी अतिशय प्रभावी आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. शिवाय पालकपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. पालकमध्ये विटामिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळून येते. शरीराच्या आरोग्यासाठी दैनंदिन आहारात पालकचे सेवन करावे. शरीरातील हाडांच्या पोषक घटकांसाठी आहारात पालकचे सेवन करावे.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात बीटचे सेवन करावे. शिवाय यामध्ये विटामिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळून येते. बीटमध्ये लोह आणि फोलेट हे विटामिन आढळून येतात. शिवाय यामुळे रक्ताची वाढ होते आणि शरीरात निर्माण झालेला थकवा कमी होतो. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही आहारात बीटचे सेवन करू शकता.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
दैनंदिन आहारात विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर सोयाबीनचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. शिवाय यामध्ये असलेले इतर घटक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. सोयाबीनचे सेवन केल्यामुळे शरीरातील थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात सोयाबीनचे सेवन करावे.