फोटो सौजन्य: iStock
सध्या जगभरात अनेक असे गंभीर आजार आहे. यातीलच एक म्हणजे कॅन्सर. हा आजार सध्या वेगाने फैलावत आहे. कॅन्सर जरी एका व्यक्तीला झाला असला तरी याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. जर वेळीच कॅन्सरचे निदान नाही केले तर पुढे हाच आजार जीवघेणा ठरू शकतो.
कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत, जे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करतात. सरव्हायकल कॅन्सर हा त्यापैकी एक आहे, जो गर्भाशयाच्या खालच्या भागात होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, सरव्हायकल कॅन्सर हा जगभरातील महिलांमध्ये चौथा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. एका अहवालाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये सरव्हायकल कॅन्सरचे सुमारे ६,६०,००० नवीन रुग्ण आढळले आणि त्यामुळे सुमारे ३,५०,००० मृत्यू झाले.
सरव्हायकल कॅन्सरचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV). हा एक लैंगिक संक्रमित आजार आहे, जो एचपीव्हीच्या सततच्या संसर्गामुळे एखाद्या व्यक्तीला होतो. जेव्हा सततच्या एचपीव्ही संसर्गावर उपचार केले जात नाहीत, तेव्हा सरव्हायकल कॅन्सर होण्याची संभावना वाढते. WHO म्हणते की ९५% सरव्हायकल कॅन्सर हे HPV संसर्गामुळे होतो. अशा परिस्थितीत, एचपीव्ही लस हा प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. याशिवाय, काही इतर सवयी देखील आहेत ज्या तुम्हाला या कॅन्सरपासून वाचवू शकतात.
जर तुम्हाला सरव्हायकल कॅन्सर रोखायचा असेल तर धूम्रपान टाळणे खूप महत्वाचे आहे. धूम्रपानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे शरीराची एचपीव्ही संसर्गाशी लढण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे सरव्हायकल कॅन्सरचा धोका वाढतो.
शारीरिक संबंध ठेवताना नेहमी कंडोम वापरा. असे केल्याने एचपीव्ही आणि इतर लैंगिक संक्रमित संसर्गांचा धोका कमी होतो ज्यामुळे सरव्हायकल कॅन्सरचा होऊ शकतो.
कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, निरोगी आहार घ्या, दररोज व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या, ध्यान आणि योगाच्या मदतीने ताणतणाव नियंत्रित करा. या सर्व टिप्सच्या मदतीने, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल, ज्यामुळे एचपीव्ही संसर्ग रोखण्यास मदत होईल.
आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्या होतील स्वच्छ
सरव्हायकल कॅन्सर टाळण्यासाठी, योग्य वेळी हा आजरा ओळखणे खूप महत्वाचे आहे. म्हणून, सुरुवातीच्या टप्प्यात हा कॅन्सर ओळखण्यासाठी नियमित पॅप स्मीअर आणि एचपीव्ही टेस्ट करा. यामुळे तुम्हाला हा हा कॅन्सर वेळेत ओळखण्यास मदत होईल, ज्यामुळे वेळेवर उपचार घेणे देखील शक्य होतील.