कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या पद्धतीने बनवा चटणी
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, शरीरात पाण्याची कमतरता, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा शरीरावर गंभीर परिणाम होतो. वाईट शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे आहारात बदल करून तेलकट तिखट पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येते. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते तर वाईट कोलेस्ट्रॉल शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट थर तयार करतो, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात.(फोटो सौजन्य – iStock)
नसांमध्ये जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या चटणीचे सेवन करावे, याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चटणीच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतील आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहील.
मिक्सरच्या भांड्यात सर्वप्रथम, टोमॅटो, धणे, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे करून घेतलेला टोमॅटो, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, धणे, मीठ टाकून बारीक वाटून घ्या.
दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात तुम्ही जर या चटणीचे सेवन केलात तर आरोग्याला अनेक फायदे होतील.
दैनंदिन आयुष्यातील ‘या’ सवयी लिव्हरचे आरोग्य बिघडवण्यासाठी ठरतात कारणीभूत, लिव्हरचे होऊ शकते नुकसान
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात नियमित हिरव्या चटणीचे सेवन करावे. टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन आरोग्य सुधारते. लसूणचा वापर दैनंदिन आहारात नियमित केला जातो. यामुळे धमन्यांमध्ये प्लेक तयार होण्याची शक्यता कमी होते. लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीर निरोगी राहते. लसूण खाल्यामुळे रक्त पातळ होतो.याशिवाय शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावत नाहीत.धणे आणि पुदिन्याच्या पानांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रिया सुधारून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.