डोळ्यांची कमी झालेली दृष्टी सुधारण्यासाठी आहारात करा 'या' भाजीचे सेवन
ऑफीसमधील काम, तासनतास मोबाईल वापरणे, सतत गेम खेळणे इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम दिसून येतो. जास्त मोबाईल वापरल्यामुळे अनेकांना आजकाल चष्मा लागला आहे. डोळ्यांची दृष्टी खराब झाल्यानंतर डोळ्यांना चष्मा कीवच लेन्स लावाव्या लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांमधील पडदा खराब झाल्यानंतर डोळ्यांसंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे दैनंदिन जीवनात मोबाईल, लॅपटॉप किंवा डिजिटल वस्तूंचा कमीत कमी वापर करावा. खराब झालेली डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी विटामिन ए महत्वाचे आहे. त्यामुळे रोजच्या आहारात विटामिन ए युक्त पदार्थांचे सेवन करावे. विटामिन ए गाजरमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. पण गाजरऐवजी तुम्ही हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डोळ्यांची कमी झालेली दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही तोंडलीचे सेवन करू शकता. तोंडलीच्या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ए आढळून येते. ज्याचा आरोग्याला फायदा होतो. शिवाय या भाजीमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व विटामिन आढळून येतात. तोंडलीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची खराब झालेली दृष्टी सुधारते. यामध्ये असलेले विटामिन ए रेटिनासाठी आवश्यक रंगद्रव्ये तयार करत. त्यामुळे दैनंदिन आहारात तोंडलीच्या भाजीचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांमुळे कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात तोंडलीचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेकज फायदे होतात. यामध्ये आढळून येणारी जीवनसत्वे रोगप्रतिकारशक्ती सुधारतात. आजारांपासून बरे होण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. हिरव्या भाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात.
हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात तोंडलीच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे हृदयावर जास्त दबाव पडत नाही. यामध्ये आढळून येणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहे. शिवाय या भाजीच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयविकाराच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तोंडलीच्या भाजीचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात तोंडलीच्या भाजीचे सेवन करावे. कारण या भाजीमध्ये कमी कॅलरीज असतात. तोंडलीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. कॅलरीज नियंत्रणात ठेवण्यासाठी तोंडलीच्या भाजीचे सेवन करावे.लठ्ठपणा वाढल्यामुळे अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य तो आहार फॉलो करावा.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
तोंडलीच्या भाजी बनवून तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात खाऊ शकता. तोंड आल्यानंतर तोंडलीची भाजी कच्ची खाल्ली जाते. शिवाय या भाजीपासून तुम्ही सॅलड बनवू शकता. लहान मुलांना तोंडली खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना क्रिस्पी तोंडली बनवून खाण्यास देऊ शकता.