हार्ट अटॅक आणि वाढत्या कोलेस्ट्रॉलपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा 'या' पाण्याचे सेवन
चुकीची जीवनशैली आणि दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते. वाढलेले कोलेस्ट्रॉल आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करतात. तर खराब कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचवते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात न राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे किंवा शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदय आणि रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यानंतर शरीराच्या आणि हृदयाच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या बारीक दाण्याचे पाणी प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरात अनेक बदल होऊ लागतात. याशिवाय शरीराची पचनक्रिया सुधारते.
धण्यामध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते.धण्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीराची खराब झालेली पचनक्रिया सुधारते आणि शरीर डिटॉक्स राहते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी धण्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे . त्यामुळे शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी धण्यांचे पाणी प्यावे. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली खराब चरबी कमी करण्यासाठी हे पाणी अतिशय प्रभावी आहे. याशिवाय शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात धण्याचे पाणी प्यावे.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी धण्यांचे पाणी अतिशय प्रभावी आहे. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे किडनी आणि लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. धण्यांचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, गरम पाण्यात धणे टाकून ५ते ६ मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर ग्लासात पाणी गाळून थंड झाल्यानंतर उपाशी पोटी सेवन करा. हा उपाय नियमित केल्यास शरीरातील घाण स्वच्छ होईल.
उच्च रक्तदाबाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहे. शरीरात उच्च रक्तदाबाची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढल्यानंतर धण्यांचे पाणी प्यावे. यामुळे शरीराचे रक्तदाब नियंत्रणात राहते.