Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्ताची कमतरता जाणवतेय? मग ‘असं’ वाढवा रक्तातील लोह, ‘या’ सुपरफुडचा आहारात समावेश कराच

हल्लीच्या काळात एखाद्या व्यक्तीचं वजन जरी नियंत्रित असलं तरी त्याला रक्ताची कमतरता जाणवते. एखादी व्यक्ती आजारी दिसत नसली तरी अनेकजण असे आहेत ज्यांना रक्त कमी असतं,याला अनेक कारणं देखील आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 16, 2025 | 06:15 AM
रक्ताची कमतरता जाणवतेय?  मग ‘असं’ वाढवा रक्तातील लोह, ‘या’ सुपरफुडचा आहारात समावेश कराच
Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम हा शरीरावर देखील होतो. खरंत आजच्या धावपळीच्या आयुष्यात बाहेरंच खाणं खूप जास्त होत असतं. त्यामुळे या बाहेरच्या खाण्याने पोट भरतं खरं पण शरीराला पोषक घटक मिळत नाही. फक्त पोटं खाणं म्हणजे शरीराची काळजी घेणं नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी असलेले पोषक घटक देखील महत्वाचे असतात. हेच पोषक घटक मिळणं कमी झालं की अनेक व्हिटामीनची कमतरता शरीरात निर्माण होते. याचशिवाय सर्वात मोठी समस्या म्हणजे रक्ताची कमतरता.

रक्त कमी असण्याची कारणे

हल्लीच्या काळात एखाद्या व्यक्तीचं वजन जरी नियंत्रित असलं तरी त्याला रक्ताची कमतरता जाणवते. एखादी व्यक्ती आजारी दिसत नसली तरी अनेकजण असे आहेत ज्यांना रक्त कमी असतं,याला अनेक कारणं देखील आहेत. महिलांना अनियमित मासिकपाळीमुळे रक्तााची कमतरता जाणवते. अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे देखील हा त्रास जाणवतो. सर्वसाधारण मुत्रविकार किंवा काही आनुवंशिक आजारांमुळे देखील रक्त कमी होतं. त्याचबरोबर व्हिटामीन B12 ची कमरता रक्त कमी असण्याचं कारण आहे.

रक्तवाढीसाठीचे सुपरफुड

जर तुम्हालाही रक्त कमी असेल आणि हिमोग्लोबीन वाढवायचं असल्यास हिरव्या पालेभाज्या खाणं फायदेशीर ठरतं. पालेभाज्या हा लोहाचा उत्तम स्रोत आहे. पालक, मेथी, शेवगा पानं, चाकवत या पालेभाज्यांमध्ये आयरन, फॉलिक अॅसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. या भाज्या दैनंदिन आहारात सामील केल्यास रक्तवाढीस मदत होते.तसेच डाळी आणि कडधान्यं जसे की मूग, मसूर, हरभरा, राजमा, चणे हे रक्तवाढीसाठी महत्त्वाचे आहेत. यात लोहाबरोबरच प्रोटीनही भरपूर असते. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मुख्य स्रोत हेच असल्याने ते नियमित खाल्ले पाहिजेत.

याचबोरबर सुकामेवा देखील रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.   खजूर, काळे मनुके, अंजीर,  हे सर्व पदार्थ लोहयुक्त असतात. दिवसभरातील मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून किंवा दुधात घालून यांचे सेवन केल्यास रक्त वाढण्यास मदत होते.याशिवाय धान्यं जसे की नाचणी, बाजरी, ज्वारी यामध्ये भरपूर लोह असते. गव्हाच्या तुलनेत ही धान्यं अधिक पौष्टिक ठरतात. नाचणीच्या साते, भाकरी किंवा लाडू हे उत्तम पर्याय आहेत.फळं यामध्ये डाळिंब, सफरचंद, संत्रं, पेरू, कीवी, स्ट्रॉबेरी, आवळा ही फळं रक्तवाढीसाठी उपयुक्त आहेत. विशेषतः संत्रं, पेरू, आवळा यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असतं ज्यामुळे लोह वाढण्यास मदत होते. त्यामुळे आयरनयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन C असलेली फळं खाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गूळ  देखील रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. गुळामध्ये लोहाबरोबरच इतर खनिजं असतात. गूळ-शेंगदाणा, गूळ-तिळाचे लाडू हे रक्तवाढीस मदत करणारे पदार्थ आहेत.

 

 

Web Title: Dates raisins figs all these foods are rich in iron and are beneficial for increasing blood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • fruits for hemoglobin
  • health

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर नियमित करा बीटच्या रसाचे सेवन, महिलांच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक
1

सकाळी उठल्यानंतर नियमित करा बीटच्या रसाचे सेवन, महिलांच्या आरोग्यासाठी ठरेल लाभदायक

सर्दीमुळे सतत कान दुखतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, कानाच्या समस्या होतील कायमच्या दूर
2

सर्दीमुळे सतत कान दुखतो? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, कानाच्या समस्या होतील कायमच्या दूर

गोड खाण्याचे फायदे तुम्हाला मागितेय का ? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?
3

गोड खाण्याचे फायदे तुम्हाला मागितेय का ? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे उद्भवतील गंभीर आजार! रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
4

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे उद्भवतील गंभीर आजार! रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.