अपूर्ण झोपेमुळे वाढतोय डायबिटीसचा धोका
आपल्या आरोग्यासाठी चांगली झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे. झोप होत नसेल तर सकाळी उठल्यापासून चिडचिड होते. पण इतकंच नाही तर झोप न झाल्यामुळे डायबिटीसारख्या आजाराचा धोका अधिक वाढतो. एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या लोकांच्या झोपेच्या कालावधीत वारंवार बदल होत असतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो आहे.
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींना आपली झोप पूर्ण करणे आवश्यक आहे आणि याशिवाय ज्यांना डायबिटीस नाही त्यांनीही काळजी घ्यायला हवी. कारण यामुळे डायिबटीसचा त्रास सुरूही होऊ शकतो. डायबिटीसला अनेक कारणे कारणीभूत ठरतात आणि अपूर्ण झोप हेदेखील त्यापैकी एक कारण आहे. (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतो अभ्यास
अमेरिकन डायबिटीस असोसिएशनने केलेल्या अभ्यासानुसार, ज्या लोकांच्या झोपेचा कालावधी सरासरी 31 ते 45 मिनिटांपर्यंत बदलतो अशा लोकांमध्ये मधुमेहाचा धोका 15% वाढला. त्याच वेळी, ज्या लोकांच्या झोपेचा कालावधी एका तासापेक्षा जास्त असतो, त्यांच्यामध्ये हा धोका 59% ने वाढला. हा अभ्यास UK Biobank मधील 84,000 हून अधिक सहभागींवर करण्यात आला. सहभागींनी सात रात्री एक एक्सेलेरोमीटर घातला, ज्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या पद्धतींचे परीक्षण केले जाऊ शकते.
हेदेखील वाचा – मधुमेह होण्यापूर्वी शरीर देते 5 संकेत, दुर्लक्ष केल्यास जीव गमवाल!
कमी झोपणाऱ्यांना जास्त धोका
झोपेचा होता डायबिटीसवर परिणाम
जे लोक कमी किंवा जास्त झोपतात त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो असेही या अभ्यासात आढळून आले आहे. जास्त झोपलेल्या लोकांमध्ये हा धोका 34% वाढला. झोपेची कमतरता आणि मधुमेह यांच्यातील संबंध दर्शविणारा हा पहिला अभ्यास नाही. गेल्या काही वर्षांत, अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, नैराश्य आणि हृदयविकार यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.
हेदेखील वाचा – डायबिटीस नियंत्रणासाठी वरदान ठरेल रानमेवा, रोजच्या रोज करा सेवन मधुमेहाची करा सुट्टी
सावधगिरी कधी बाळगावी
अशी घ्या काळजी
जर तुम्हालाही झोपेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. नियमित झोप येण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता, जसे की झोपण्याची ठराविक वेळ पाळणे, झोपण्यापूर्वी फोनचा वापर कमी करणे आणि झोपण्यासाठी आरामदायक वातावरण तयार करणे ही गरज आहे. हा अभ्यास पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपल्या एकूण आरोग्यासाठी चांगली झोप किती महत्त्वाची आहे. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
संदर्भ
https://www.webmd.com/diabetes/type-2-diabetes-sleep
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5070477/