dinvishesh
ता: 10 – 5 – 2023, बुधवार
तारीख – संवत
तारीख 20, शके 1945, विक्रम संवत 2080, उत्तरायण उन्हाळा, ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी 13:49, नंतर षष्ठी
सूर्य उदय – 5:49, सूर्यास्त – 6:47
सूर्योदय वेळ नक्षत्र – पूर्वाषाढा 16:12, योग – साध्या 18:16, नंतर शुभ, करण – तैतिल 13:49, त्यानंतर गराज 24:38, त्यानंतर वणीज.
आनंदाचा दिवस – आजचा दिवस शुभ आहे
ग्रह संक्रमण: सूर्य – मेष, चंद्र – मकर, मंगळ – कर्क, बुध – मेष, गुरु – मेष,
शुक्र – मिथुन, शनि – कुंभ, राहू – मेष,
केतू – तूळ
राहु काल – दुपारी 12:00 ते 1:30 पर्यंत
दिशा शूल – उत्तर आणि ईशान्य (ईशान्य)
आराधना – देवीची पूजा आणि उपासना
उपासना – काम, धनप्राप्तीसाठी व्रत आणि उपासना
खरेदीसाठी शुभ मुहूर्त – आज सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्वा आणि उत्तराषाढा नक्षत्र असून खरेदीसाठी शुभ मुहूर्त नाही.
भाग्यशाली रंग – पांढरा, हलका राखाडी
भाग्यवान क्रमांक – 5, 1, 4
१९९७: ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले.
१९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली.
१९९३: संतोष यादव – दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्या पहिलय भारतीय महिला ठरल्या.
१९८१: फ्रान्सवा मितराँ फ्रान्सचे अध्यक्ष बनले.
१९७९: मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
१९६२: मार्वल कॉमिक्सने द इक्रीडिबल हल्क या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला.
१९४०: दुसरे महायुद्ध नेव्हिलचेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
१९०७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामाचा सुवर्णमहोत्सव लंडनमधे साजरा केला.
१८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली.
१८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
१९३७: माणिक गोडघाटे – आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा (निधन: २६ मार्च २०१२)
१९३१: जगदीश खेबुडकर – ज्येष्ठ गीतकार
१९१८: रामेश्वर नाथ काओ – भारतीय रिसर्च अँड ऍनॅलेसिस विंग (RAW) गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष (निधन: २० जानेवारी २००२)
१९१४: ताराचंद बडजात्या – चित्रपट निर्माते, राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक (निधन: २१ सप्टेंबर १९९२)
१९०९: बेल्लारी केसवन – भारतीय सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ – पद्मश्री (निधन: १६ फेब्रुवारी २०००)
१८९७: एनर गेरहर्देसन – नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान (निधन: १९ सप्टेंबर १९८७)
१८८९: नारायण दामोदर सावरकर – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार
१८५५: युकतेश्वर गिरी – भारतीय गुरु आणि शिक्षक (निधन: ९ मार्च १९३६)
१२६५: फुशिमी – जपानचे सम्राट (निधन: ८ ऑक्टोबर १३१७)
२०२२: पं. शिवकुमार शर्मा – भारतीय प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार – पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १३ जानेवारी १९३८)
२०२२: लिओनिड क्रावचुक – युक्रेनचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० जानेवारी १९३४)
२०१५: निनाद बेडेकर – भारतीय इतिहासकार, लेखक (जन्म: १७ ऑगस्ट १९४९)
२००२: कैफी आझमी – गीतकार (जन्म: १४ जानेवारी १९१९)
२००१: सुधाकरराव नाईक – महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री (जन्म: २१ ऑगस्ट १९३४)
२०००: ना. घ. देशपांडे – कवी नागोराव घन (जन्म: २१ ऑगस्ट १९०९)
१९९८: यदुनाथ थत्ते – लेखक, संपादक (जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)
१९८१: विनायक माधव दीक्षित पटवर्धन – विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा