dinvishesh
ता : 18 – 5 – 2023, गुरुवार
तिथी : संवत्सर
मिती 28, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म ऋतू, वैशाख कृष्ण पक्ष चतुर्दशी 21:42
सूर्योदय : 5:46, सूर्यास्त : 6:51
सूर्योदयकालीन नक्षत्र – अश्विनी 7:21 नंतर भरणी, योग – सौभाग्य 19:35 नंतर शोभन, करण- विष्टी 10:02, नंतर शकुनी 21:42 पश्चात चतुष्पाद
केतु – तूळ
भद्रा : स. 10:02 वाजता समाप्त
मूळ : स. 7:21 वाजता समाप्त
राहुकाळ : दुपारी 1:30 से 3:00
शुभ अंक : 3,6,9
शुभ रत्न : गुरू ग्रहासाठी पुखराज
शुभ रंग : जांभळा, पिवळा, निळा, गुलाबी
२०२२: मोरबी, गुजरात येथील मिठाच्या कारखान्याची भिंत कोसळली, त्यात बारा कामगारांचे निधन तर अनेक बेपत्ता आहेत.
२००९: श्रीलंका – सरकार-एलटीटीई यांच्यातील युद्ध एलटीटीईला पराभूत करून संपले.
१९९८: सुरेन्द्र चव्हाण – जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केले.
१९९५: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया – स्थानिक बँकेतील ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा देण्यात आली.
१९९१: हेलन शेरमन – ह्या पहिल्या महिला ब्रिटिश अंतराळयात्री बनल्या.
१९९०: फ्रान्स देशातील टीजीव्ही रेल्वेने ५१५.३ किमीताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.
१९७४: स्मायलींग बुद्धा – भारत देशाने पहिल्या आण्विक अस्त्राची यशस्वी चाचणी पोखरण, राजस्थान येथे केली. या मिशनचे नाव स्मायलींग बुद्धा असे होते.
१९७२: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ – सुरूवात.
१९३८: गोपालकृष्ण हा चित्रपट प्रदर्शित झाला.
१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला श्री पुंडलिक हा पहिला मूकपट प्रदर्शित झाला.
१८०४: नेपोलिअन बोनापार्ट – फ्रान्सचे सम्राट बनले.
१९७९: जेन्स बर्गेनस्टेन – माईनक्राफ्टचे सह-डिझाइन, स्वीडिश व्हिडिओ गेम डिझायनर
१९३३: एच. डी. देवेगौडा – भारताचे ११ वे पंतप्रधान
१९२५: इग्नेशियस पॉल पिंटो – भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (निधन: ८ फेब्रुवारी २०२३)
१९२०: करोल जोझेफ वोजट्यला – पोप जॉन पॉल (दुसरे), २६४वे पोप (निधन: २ एप्रिल २००५)
१९२०: जॉन पॉल (दुसरा) – पोप (निधन: २ एप्रिल २००५)
१९१३: पुरुषोत्तम काकोडकर – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते (निधन: २ मे १९९८)
१९०९: व्हिन्सेंट डु विग्नॉड – अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पारितोषिक (निधन: ११ डिसेंबर १९७८)
१८९५: ऑगस्टो सँडिनो – निकाराग्वा देशाचे क्रांतिकारक (निधन: २१ फेब्रुवारी १९३४)
१८७२: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, इतिहासकार, आणि तत्त्वज्ञ – नोबेल पारितोषिक (निधन: २ फेब्रुवारी १९७०)
१६८२: छत्रपती शाहू महाराज (पहिले) – मराठा साम्राज्याचे ५वे छत्रपती (निधन: १५ डिसेंबर १७४९)
१०४८: ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (निधन: ४ डिसेंबर ११३१)