
dinvishesh
ता. : 18 – 10 – 2023, बुधवार
तिथी: चतुर्थी
मिती: राष्ट्रीय मिति 25, शके 1945, विक्रम संवत 2080, दक्षिणायन शरद ऋतु, आश्विन शुक्ल पक्ष चतुर्थी
सूर्योदयकालीन नक्षत्र: अनुराधा 8:50, योग – आयुष्मान 08:16,करण- वणिजा 13:20, नंतर विष्टी
सूर्योदय: 06:26, सूर्यास्त: 06:45
शुभ रंग: पांढरा, राखाडी
शुभ अंक: 5, 1, 4
शुभ रत्न: बुधासाठी पन्ना
दिनविशेष 18 ऑक्टोबर- घटना
जागतिक रजोनिवृत्ती दिन
2002: कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वीस हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर पहिला क्रिकेटपटू ठरला.
1977: 2060-चिरॉन हा अंतरिक्षातील सर्वात दूरवरील लघुग्रह शोधण्यात आला.
1967: सोव्हिएत रशियाचे व्हेनेरा-4 हे अंतराळयान शुक्रावर उतरले.
1954: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सने पहिल्या ट्रान्झिस्टर रेडिओची घोषणा केली.
1922: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनची स्थापना.
1919: राम गणेश गडकरी लिखित संगीत भावबंधन या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या बळवंत संगीत नाटक मंडळीने केला.
1906: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
1879: थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना.
1867: सोव्हिएत रशियाला 72 लाख डॉलर देऊन अमेरिकेने अलास्का हा प्रांत खरेदी करुन ताब्यात घेतला.
दिनविशेष 18 ऑक्टोबर – जन्म
1984: फ्रीडा पिंटो – भारतीय अभिनेत्री
1977: कुणाल कपूर – भारतीय अभिनेते
1974: अमिश त्रिपाठी – भारतीय लेखक
1965: झाकीर नाईक – इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ)चे संस्थापक आणि अध्यक्ष
1956: मार्टिना नवरातिलोव्हा – झेकोस्लोव्हाकियाची लॉन टेनिस खेळाडू
1950: ओम पुरी – भारतीय अभिनेते – पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
दिनविशेष 18 ऑक्टोबर – निधन
1995: ई. महमद – छायालेखक
1993: मंदाकिनी विश्वनाथ आठवले – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री
1987: वसंतराव तुळपुळे – कम्युनिस्ट कार्यकर्ते
1983: विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
1976: विश्वनाथ सत्यनारायण – भारतीय कवी आणि लेखक
1951: हिराबाई पेडणेकर – भारतीय पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार
1931: थॉमस अल्वा एडिसन – विजेच्या दिव्याचे अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
1909: लालमोहन घोष – काँग्रेसचे सोळावे अध्यक्ष
1889: अँटोनियो म्यूची – आवाजाने संवाद करणारे उपकरण, टेलिफोनचे पहिले शोधक
1871: चार्ल्स बॅबेज – पहिल्या यांत्रिकी संगणकाचे कल्पनेचे जनक