थायरॉईडचा त्रास पुरुषांना होऊ शकतो का
महिलांमध्ये थायरॉईड विकार होणे हे जरी सामान्य असले तरी पुरुषांना हा त्रास होणारच नाही असे नाही. मानेमध्ये असलेली थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय, ऊर्जा उत्पादन आणि हार्मोनल संतुलन यासारख्या आवश्यक कार्यांचे नियमन करते. जेव्हा ही ग्रंथी कमी सक्रिय असते (हायपोथायरॉईडीझम) किंवा अति सक्रिय असते (हायपरथायरॉईडीझम), तेव्हा पुरुषांमध्ये आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे थायरॉईडचे वेळीच निदान आणि उपचार करणे आवश्यक ठरते. न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय आहेत लक्षणे
जर पुरुषांना विनाकारण जाणवणारा थकवा, वजन वाढणे किंवा कमी होणे, नैराश्य, केस विरळ होणे किंवा हृदयाच्या ठोक्यातील बदल यासारखी लक्षणे जाणवतात त्यांनी थायरॉईड चाचणीचा विचार करावा. स्नायूमधील कमकुवतपणा, कोरडी त्वचा, बद्धकोष्ठता, किंवा थंडी आणि उष्णता सहन न होणे ही थायरॉईड बिघडल्याची लक्षणे आहेत. ज्यांच्या घरात थायरॉईड किंवा ऑटोइम्युन विकाराचा इतिहास आहे किंवा हाय रेडीएशन लेव्हलच्या संपर्कात आलेल्या पुरुषांना याचा जास्त धोका असतो त्यामुळे त्यांनी चाचणी बाबत विशेष आवश्यक आहे.
सतत थकवा जाणवतो? डोकेदुखीचा त्रास वाढत चाललाय? असू शकतो थायरॉईड, जाणून घ्या लक्षणे
महत्त्वाची लक्षणे काय आहेत
पुरूषांमधील थायरॉईडमधील लक्षणे
पुरुषांना थायरॉईड झाल्यास काय होते
हायपोथायरॉईडीझम असलेल्या पुरुषांची टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते, कामवासना कमी होऊ शकते आणि त्यांना प्रजनन विषयक समस्या उद्भवू शकतात. तर हायपरथायरॉईडीझममुळे मूड स्विंग, हृदय धडधडणे आणि निद्रानाश होऊ शकतो. उपचार न केल्यास, थायरॉईड विकारांमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, ऑस्टिओपोरोसिस आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
थायरॉईड चाचणी
थायरॉईड चाचणी म्हणजे सामान्यतः टीएसएच(थायरॉईड-स्टीम्युलेटींग हार्मोन), T3 आणि T4 चे स्तर मोजण्याची एक साधी रक्त चाचणी असते. काही समस्या आढळली तर डॉक्टर पुढील तपासणी आणि उपचार करण्याचा सल्ला देतात.
सहसा पुरूष थायरॉईड-विषयक लक्षणांचा संबंध वयोमान, ताण याच्याशी लावून एकतर त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा फेटाळून लावतात. दीर्घकालीन आजार टाळण्यासाठी तसेच निरोगी राहण्याच्या दृष्टीने थायरॉईड चाचणी सह नियमित आरोग्य तपासण्या करून घेणे आवश्यक आहे. सुरुवातीची लक्षणे लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ला घेतल्यास पुरुष त्यांच्या थायरॉईड विकारांची योग्य काळजी घेऊ शकतील तसेच त्यांचे आरोग्यमान सुधारेल. संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, तुमचे थायरॉईड आरोग्य तुमच्या आरोग्याच्या इतर कोणत्याही पैलू इतकेच महत्त्वाचे आहे.