मध ( Honey) हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने अनेकजण निरोगी आरोग्यासाठी त्याचे दररोज सेवन करतात. परंतु, हल्ली बाजारात भेसळयुक्त मधाच्या (Adulterated honey) [blurb content=””]विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा भेसळयुक्त मधाने आरोग्याला लाभ होण्या ऐवजी आरोग्य अधिक बिघडताना दिसते. त्यामुळे शुद्ध मध आणि भेसळयुक्त मधामधील फरक कसा ओळखाल हे जाणून घेणे सध्याच्या काळात फार आवश्यक आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर शुद्ध मध कसे ओळखावे हे जाणून घेऊयात.
आयोडीन परीक्षा : आयोडिनचा वापर करूनदेखील मधाच्या शुद्धतेची परीक्षा करता येते. थोडासा मध घेऊन पाण्यात मिसळा आणि त्यात आयोडीन टाका. आयोडीन मिसळल्यानंतर या मिश्रणाला निळा रंग प्राप्त झाल्यास मधात स्टार्च अथवा तत्सम पदार्थाची भेसळ करण्यात आल्याचे समजावे.
पाणी परीक्षा : या परीक्षेत एक ग्लास पाण्याच्या वापर करून तुम्ही शुद्ध मधाची परीक्षा करू शकता. यासाठी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घाला. जर मध पाण्याच्या तळाशी गेला तर तो मध शुद्ध असल्याचे समजावे. जर मध पाण्यात मिसळला तर त्या मधात भेसळ असल्याचे समजावे.
अग्नी परीक्षा : प्रज्ज्वलित होणे ही शुद्ध मधाची परीक्षा आहे. एका पेटलेल्या काडीपेटीच्या काडीने थोड्याशा मधाला आग लावून पाहावी. मधाने पेट घेतल्यास तो मध शुद्ध असल्याचे समजावे.
अंगठा परीक्षा : यासाठी मधामध्ये अंगठा बुडवून बाहेर काढावा. मध अंगठ्यावरून गळून खाली पडला आहे अथवा अंगठ्याला चिकटून राहिला आहे ते पाहावे. मध अंगठ्याला चिकटून राहिला असले तर तो मध शु्द्ध असल्याचे समजावे. भेसळयुक्त मध पाण्याप्रमाणे अंगठ्यावरून गळून खाली पडेल.