फोटो सौजन्य - Social Media
वाढते प्रदूषण, हवामानातील बदल तसेच व्यक्तीच्या जीवनशैलीतील बदल चेहऱ्यावर अनेक दुष्परिणामांना कारणीभूत ठरतात. चेहरा निस्तेज करतात. सध्याच्या काळामध्ये तरुण असो वा प्रौढ प्रत्येकाला चेहऱ्यावर निखारे हवा आहे. जसे जसे वय वाढते तसे तसे चेहर्यावरील तेज कमी होत जातो. आतातर तरुण मंडळीही चेहऱ्याच्या अनेक समस्यांना त्रासली आहे. वाढते प्रदुषन तसेच जीवनशैलीमध्ये होणारे बदल या गोष्टींना कारणीभूत ठरतात.
हे देखील वाचा : घरी आणलेली झेंडूची फुले फेकून न देता ‘या’ पद्धतीने करा त्वचेसाठी वापर, दिसाल सुंदर फ्रेश
आपल्या चेहऱ्याचा हरवलेला नूर परत मिळवायचा आहे का? यासाठी योगासन तुम्हाला मदत करेल. योगासने ही भारतीय पद्धत देशविदेशामध्ये गाजत आहे. अनेक देशांमध्ये योगाचे क्लासेसही सुरु करण्यात आले आहे. परदेशी लोक मोठ्या संख्यने योगा ही भारतीय संस्क्रृती जपण्यात आणि स्वतःचे आरोग्य निरोगी ठेवण्यात रस घेत आहेत. योगासन केल्याने चेहऱ्यावर रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्याचा अतिरिक्त फॅट कमी होतो. तसेच, हे त्वचेवरील डाग आणि अन्य समस्याही कमी करण्यास मदत करते. येथे आम्ही तुम्हाला अशा ५ योगासनांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या चेहऱ्यावर चमक आणि कस वाढवतील.
भुजंगासन (Cobra Pose)
भुजंगासन करण्याचे अनेक फायदे आहेत. खासकरून चेहऱ्याला आणि मानेला या आसनाचा खूप फायदा होतो. या भागांकडे रक्ताभिसरण सुधारते. मात्र, जर तुम्हाला पाठदुखी, हर्निया किंवा गर्भावस्था असेल तर हे आसन टाळा.
मत्स्यासन (Matsyasana)
माशाच्या मुद्रेमध्ये हे आसन केले जाते. या आसाममध्ये छाती आणि मानेचे स्नायू उघडते, ज्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजन मिळतो. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर हे आसन करणे शक्यतो टाळावे.
हलासन (Halasana)
हलासन केल्याने चेहऱ्यावर रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचा उजळते. मात्र, जर तुम्हाला मानेची दुखापत, दस्त किंवा उच्च रक्तदाब असेल, तर हे आसन करणे टाळा.
हे देखील वाचा : मैद्याचे नूडल्स खाणे सोडा, लहान मुलांसाठी घरीच तयार करा पौष्टिक बटाट्याचे नूडल्स
अधोमुख श्वानासन (Downward Dog Pose)
अधोमुख श्वानासन रक्ताभिसरण वाढवते आणि ताण कमी करते. हे असं केल्याने चेहरा निखरून येतो. मात्र, कार्पल टनल सिंड्रोम असल्यास, हे आसन सावधगिरीने करावे. ही योगासने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारून त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. परंतु पाठदुखी, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास योग्य ती काळजी घ्या.