झेंडूच्या फुलांचे टोनर
सणासुदीच्या दिवसांमध्ये बाजारात झेंडूच्या फुलांसह इतर वेगवेगळ्या प्रकारची फुले बाजारात उपलब्ध असतात. त्यातील सार्वधिक वापरली जाणारी फुले झेंडू, मोगरा, गुलाब. या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. घरी कोणताही कार्यक्रम असल्यानंतर बाजारातून झेंडूची फुले विकत आणली जातात. घराला तोरण लावणे, गाडीला हार, देव पूजा करताना इत्यादी अनेक गोष्टींसाठी या फुलांचा वापर केला जातो. केशरी आणि पिवळ्या रंगाचा झेंडू बाजारात सहज उपलब्ध होतो. घरी आणलेल्या फुलांचा वापर करून झाल्यानंतर फुल एकतर टाकून दिली जातात किंवा फुलांचे पाण्यात विसर्जन केले जाते.
पण झेंडूची फुले टाकून देण्याऐवजी तुम्ही या फुलांचा वापर करून हेअर मास्क आणि टोनर बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. झेंडूच्या फुलांमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात. ज्याचा त्वचेला आणि केसांना फायदा होतो. या फुलांमध्ये ग्लायकोप्रोटीन आणि न्यूक्लियोप्रोटीन आढळून येते, ज्यामुळे खराब झालेली त्वचा पुन्हा एकदा उजळण्यास मदत होते. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही झेंडूच्या फुलांचा वापर करु शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: काखेतील काळेपणा मिनिटांमध्ये होईल गायब, अशा पद्धतीने करा ‘या’ घरगुती पदार्थाचा वापर
झेंडूच्या फुलांचे टोनर त्वचेवर वापरल्यामुळे त्वचा फ्रेश आणि सुंदर दिसेल. टोनर बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात 4 किंवा 5 झेंडूची फुले टाकून पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवा. पाण्यात उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होण्यासाठी ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या. नंतर पाण्यात कोरफड जेल टाकून मिक्स करा. हे टोनर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी त्वचेला लावू शकता. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग निघून जाण्यास मदत होईल.
हातापायावरील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही झेंडूच्या फुलांचा स्क्रब घरीच बनवू शकता. यासाठी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर त्यात साखर आणि मध टाकून संपूर्ण हातापायांना व्यवस्थित लावून स्क्रब करा. यामुळे डेड स्किन निघून जाऊन त्वचा उजळण्यास मदत होईल. झेंडूच्या फुलांचा स्क्रब त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरेल.
हे देखील वाचा: रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क, सकाळी चेहरा दिसेल सुंदर
झेंडूच्या फुलांचा हेअर मास्क केसांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी आहे. हेअर मास्क बनवण्यासाठी झेंडूच्या फुलांची बारीक पेस्ट बनवून त्यात आवळा पावडर मिक्स करा. नंतर त्यात कोरफड जेल टाकून पुन्हा एकदा मिक्स करा. तयार केलेले मिश्रण केसांना लावून काहीवेळ ठेवून मग केस स्वच्छ करा. यामुळे केस मजबूत आणि मऊ होण्यास मदत होईल.