शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा 'या' सवयींमध्ये बदल
शिड्या चढताना धाप का लागते?
शारीरिक हालचालींच्या अभावामुळे उद्भवणाऱ्या समस्या?
सतत दम कशामुळे लागतो?
health Care Tips: हल्ली प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत. जीवनशैलीत होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक तणाव, पोषक घटकांची कमतरता, पचनक्रिया बिघडणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शिड्या चढताना किंवा थोडस काम केल्यानंतर लगेच खूप जास्त थकल्यासारखे वाटते किंवा धाप लागते. १० शिड्या चढून आल्यानंतर दम लागणे किंवा धाप लागणे अतिशय सामान्य आहे. पण कामाच्या शिड्या चढल्यानंतर किंवा थोडस चालल्यानंतर धाप लागत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. कारण वजन वाढल्यानंतर किंवा अजिबात शारीरिक हालचाल न केल्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नाही, ज्याच्या परिणामामुळे हृदयाचे ठोके वाढतात. किंवा खूप थकल्यासारखे सुद्धा वाटते.(फोटो सौजन्य – istock)
शिड्या चढून आल्यानंतर घाम येणे. धाप लागणे किंवा खूप जास्त थकल्यासारखे वाटणे ही लक्षणे हार्ट अटॅकच्या येण्याच्या आधी सुद्धा दिसून येतात. त्यामुळे आराम केल्यानंतर सुद्धा धाप लागत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. नियमित्र न चालणे, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे कार्डिओवॅस्कुलर फिटनेस कमी झाल्यामुळे शिडी चढण्यासारख्या एक्टिव्हीटीज करताना शरीरावर जास्तीचा तणाव येतो. शरीरावर वाढलेल्या तणावामुळे हृदयाचे रक्त वेगाने पंप होते. चला तर जाणून घेऊया शिडी चढल्यानंतर धाप लागण्याची कारणे.
शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबीचा थर झपाट्याने वाढू लागतो. ज्याच्या परिणामामुळे शिड्या चढणे किंवा कोणत्याही हालचाली करताना खूप जास्त थकल्यासारखे वाटते आणि लगेच दम लागतो. त्यामुळे नियमित व्यायाम, शारीरिक हालचाली आणि संतुलित आहार घेणे फार आवश्यक आहे. यामुळे तुम्ही आरोग्य सुधारू शकता.
शरीरासाठी रक्त फार महत्वाचे आहे. पण रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तात ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचू शकत नाही. ज्याच्या परिणामामुळे चालल्यानंतर किंवा थोड्याशा शारीरिक हालचालीनंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. दम लागल्यासोबतच थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे किंवा डोकेदुखीचा त्रास वाढतो. त्यामुळे रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.
शिड्या चढताना तुम्हाला जर वारंवार थकल्यासारखे किंवा धाप लागणे, छातीमध्ये भरून येणे इत्यादी लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. तसेच शिड्या चढण्याआधी व्यवस्थित खोल श्वास घ्या आणि त्यानंतर चढा. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
Ans: शारीरिक तंदुरुस्ती कमी असणे, वजन वाढणे, दीर्घकाळ व्यायामाचा अभाव, झोपेची कमतरता, अशक्तपणा किंवा रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे यामुळे शिड्या चढताना दम लागू शकतो.
Ans: हो. छातीत दडपण किंवा दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, थंड घाम किंवा असामान्य थकवा यासोबत दम लागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने वैद्यकीय मदत घेणे योग्य आहे.
Ans: लक्षणे सतत जाणवत असतील किंवा पूर्वीपेक्षा कमी हालचालीतही दम लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरजेनुसार रक्ततपासणी, हृदय किंवा फुफ्फुसांची तपासणी केली जाऊ शकते.






