मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या 'या' चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
मुतखडा पुन्हा होण्याची कारणे?
जीवनशैलीतील कोणत्या सवयींचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो?
किडनी स्टोन पुन्हा होऊ नये म्हणून काय करावे?
Kidney Stone: शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. रक्त शुद्ध करण्यापासून ते अगदी शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकणे इत्यादी अनेक कामे किडनी करते. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. मुतखडा झाल्यानंतर पोटात वेदना, उलट्या, मळमळ तर काहीवेळा असह्य वेदना होतात, ज्याच्या परिणामामुळे रोजची कामे करताना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पडून गेलेला किडनी स्टोन पुन्हा होऊ शकतो? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायम पडतात. शरीरातून बाहेर पडून गेलेला किडनी स्टोन जीवनशैलीतील चुकीच्या बदलांमुळे पुन्हा एकदा होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)
मुतखडा पुन्हा होण्याची कारणे?
मुतखडा झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सामान्य पोट दुखी किंवा वेदना समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे केल्यामुळे स्टोनचा आकार वाढतो आणि लघवीमध्ये किंवा किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. त्यामुळे मुतखडा नेमका कशामुळे होत आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देणे फार आवश्यक आहे. रोजच्या सवयींमधील छोट्या-छोट्या चुका किडनीचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. एकदा ऑपरेशन किंवा औषधोपचाराने खडा बाहेर पडून गेल्यास तो पुन्हा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जीवनशैलीतील या सवयींमध्ये बदल करणे फार आवश्यक आहे. किडनी रक्ताचे फिल्टर करून शरीरातील घाण लघवीच्यावाटे बाहेर काढून टाकते. पण जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम, ऑक्सलेट, यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होऊ लागते, तेव्हा किडनी फिल्टर करताना अडथळे निर्माण होतात. यामुळे छोटे-छोटे क्रिस्टल्स तयार होतात. त्यामुळे आधीपासूनच किडनी स्टोनचा त्रास असेल तर भविष्यात सुद्धा स्टोन होण्याची शक्यता असते.
शरीरातील विविध अवयवांची कार्य सक्रिय राहण्यासाठी शरीराला पाण्याची फार आवश्यकता असते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहते. पण कमी पाण्याच्या सेवनामुळे लघवी जास्त दाट होते. लघवीमध्ये हेच घटक क्रिस्टल बनतात. उन्हाळ्यात जास्त घाम सुटणे, जास्त वेळ उन्हात राहणे, व्यायाम करणे किंवा शारीरिक मेहनत करणे, कमी पाण्याचे सेवन करणे इत्यादी गोष्टींच्या परिणामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे.
आपल्यातील अनेकांना जेवणात कायमच खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. जेवणात मीठ असून सुद्धा वरून पुन्हा एकदा मीठ टाकून खाल्ले जाते. पण मिठामध्ये असलेल्या सोडियममुळे स्टोन वाढतात. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे बाहेर पडून जाते. लघवी घट्ट झाल्यामुळे आणि शरीरातील इतर पदार्थ मिक्स झाल्यामुळे या घटकांचे छोटे-छोटे खडे तयार होतात.
नियमित भरपूर पाण्याचे सेवन करणे फार आवश्यक आहे.
रोजच्या आहारात कमीत कमी मिठाचा समावेश करावा.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवावे.
किडनी स्टोन झाल्यानंतर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: शरीरात पाण्याची कमतरता, आहारातील जास्त मीठ, काही प्रकारच्या पदार्थांचे अतिसेवन, लठ्ठपणा आणि काही वैद्यकीय कारणांमुळे मुतखडा पुन्हा होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: होय. पुरेसे पाणी न प्यायल्यास लघवी अधिक घट्ट होते आणि त्यातील काही खनिजे एकत्र येऊन मुतखडा तयार होण्याचा धोका वाढू शकतो.
Ans: पाण्याची गरज व्यक्तीनुसार बदलते. साधारणपणे दिवसभर नियमित पाणी पिणे आणि लघवी फिकट रंगाची राहील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी द्रवपदार्थांवर मर्यादा सांगितली असल्यास त्यांचा सल्ला पाळावा.






