जर मुलाला चालायला त्रास होत असेल तर तुम्ही तुमचा हात धरून त्यांना हलवायला लावू शकता. हळूहळू, अशा प्रकारे मदत केल्यावर, तो आधाराशिवाय चालायला सक्षम आहे. याशिवाय, तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या वस्तू घ्यायला ये ये असं बोलावू शकता. मुलाला दुखापत होण्याच्या भीतीने नेहमी मुलाला आपल्या मांडीवर घेऊ नका. यामुळे मुल उशिरा चालायला शिकतं आणि त्यांना चालायला खूप त्रास होऊ शकतो. बाळ उशीरा चालायला लागण्याची कारणे
चालायला सुरुवात करणे हा बाळाच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. लहान मुले साधारणपणे ९ ते १२ महिन्यांत चालायला लागतात आणि बरीच बाळे १५ महिन्यांतही चालायला लागतात. पण अशी अनेक मुलं आहेत जी खूप उशीरा चालायला लागतात. अनेक वेळा अशी परिस्थिती पाहून पालक घाबरतात, पण घाबरण्याऐवजी तुम्ही त्यावर उपाय करण्याचा विचार करावा. काहीवेळा असं देखील होऊ शकतं की अनुवांशिकतेमुळे मुलं उशिरा चालायला लागतात.
काही वेळा पोषणाअभावी किंवा वजन जास्त असल्यमुळे बाळाचे स्नायू बळकट होत नाहीत आणि त्यामुळे त्याला चालणे कठीण होते. घाबरण्याची गरज नाही कारण स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून सोबत बाळाला पोषक आहार देऊन तुम्ही बाळाला सक्षम करू शकता. पाय बाहेरच्या बाजूला वाकल्यामुळे मुलाला चालतानाही त्रास होऊ शकतो. यामुळे काही बाळं लवकर चालत नाहीत तर चालताना पुढे वाकण्याची सवय त्यांना लागते. कधीकधी ही समस्या २ वर्षांच्या वयानंतर बरी होऊ शकते. जन्माच्या वेळी, बाळाचे तळवे दुमडलेले असतात. तळवे सरळ व्हायला वेळ लागतो. जर तुमच्या मुलाचे तळवे सपाट असतील तर त्यांना चालताना त्रास होऊ शकतो. याच कारणामुळे चालताना त्याचे घोटे वाकलेले दिसतात. ही समस्या काही वर्षांनी बरी होऊ शकते, परंतु मूल मोठं झाल्यानंतर ही समस्या संपते.
काही वेळा घरातील वातावरणामुळे बाळ उशिराने चालायला शिकतं. खरं तर प्रत्येकालाच मुलं आवडतात. अशा परिस्थितीत घरातील लोक प्रत्येक गोष्टीत मुलाला आपल्या मांडीवर उचलतात आणि जेव्हा पडतात धडपडतात तेव्हा लगेच त्यांना आपल्या मांडीवर उचलतात आणि त्यांना शिकण्याची संधी देत नाहीत, यामुळे मूल चालण्याचा प्रयत्न करत नाही. पण जर तुम्ही दुखापतीच्या भीतीने बाळाला मोकळं सोडणार नाही तर बाळाचे स्नायू आतून मजबूत होत नाहीत, म्हणून त्यांना आधाराशिवाय चालू द्या. यामुळे दुखापती होऊन बाळ अधिक मजबूत होईल आणि स्वतःहून चालू लागेल.