
तोंड झाकून झोपल्यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो. आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो. तोंड झाकले असल्यास बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा श्वासातून शरीरात जातो. यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते. परिणामी डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा जाणवणे, झोपेत घुसमट होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
याशिवाय तोंड झाकून झोपल्याने ओलावा आणि उष्णता वाढते. हा ओलसरपणा वातावरणातील जंतू आणि बॅक्टेरियांचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अॅलर्जी किंवा श्वसनसंस्थेचे संसर्ग वाढण्याची शक्यता असते. दमा किंवा स्लीप अॅप्निया असलेल्या रुग्णांसाठी ही सवय अधिक धोकादायक ठरू शकते.
हिवाळ्यात सुरक्षित झोपेसाठी काही सोपे उपाय करता येतात. तोंड झाकण्याऐवजी गरम कपडे घालून झोपा, जसे की मोजे, फुल बाह्यांचे कपडे किंवा टोपी. खोलीत थंड हवा थेट अंगावर येणार नाही याची काळजी घ्या. रजई किंवा ब्लँकेट छातीपर्यंत ठेवा, पण चेहरा मोकळा ठेवा. गरज असल्यास हलका स्कार्फ फक्त मानाभोवती घ्या, तोंडावर नाही.थंडीपासून बचाव महत्त्वाचा असला तरी आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. म्हणूनच हिवाळ्यात तोंड झाकून झोपण्याची सवय आजच मोडा आणि निरोगी, सुरक्षित झोपेची सवय लावा.
Ans: थंडीपासून बचाव व्हावा, शरीराला ऊब मिळावी आणि थंड हवा थेट श्वसनात जाऊ नये या हेतूने अनेक जण तोंड झाकून झोपतात.
Ans: तोंड झाकल्यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा येतो. बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्साइड पुन्हा शरीरात जातो, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते.
Ans: डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, घुसमट, अस्वस्थ झोप, कधी कधी झोपेत गुदमरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.