(फोटो सौजन्य – istock)
FSSAI चा मोठा निर्णय: आता ‘ग्रीन टी’ला आता चहा म्हणता येणार नाही; विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा
चुकीचा आहार, प्रदूषण, धूळ आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे कमी वयातच पांढरे केस होऊ लागतात. पण चिंता करण्याची गरज नाही कारण काही घरगुती देसी उपायाने देखील पांढऱ्या केसांना काळे बनवता येऊ शकते. नैसर्गिक पद्धतीने केसांचे आरोग्य जपण्यासाठी कारल्याचा रस आणि काळी मिरीचा वापर अत्यंत फायद्याचा ठरतो. यातील पोषक घटक केसांना फक्त काळेच बनवत नाही तर नैसर्गिकरित्या त्यांना जाड आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.
कारल्याच्या रसाचे फायदे
कारल्याचा रस आरोग्यासाही कोणत्या जादूहुन कमी नाही हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे पण अनेकांना हे माहिती नाही की याचा वापर केसांना काळे बनवण्यासाठीही केला जाऊ शकतो. कारल्यातील अँटीऑक्सिडंट्स टाळूतील कोंडा मुळापासून दूर करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. यामुळे टाळूचा कोरडेपणा कमी होतो आणि केसांना नैसर्गिकरित्या मजबूती मिळते. आजकाल केसांना फाटे फुटण्याच्या समस्याही फार वाढल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण कारल्याचा रस नियमितपणे वापरल्याने फाटे फुटण्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळवता येते.
काळी मिरीची फायदे
जेवणाची चव वाढवण्यासाठी काळी मिरीचा वापर केला जातो परंतु याचा नैसर्गिक हेअरडाय म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. यासाठी १ चमचा काळी मिरी पावडर, थोडे लिंबू आणि अर्धा कप दही मिसळून त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट केसांना लावा आणि सुमारे १ तास या पेस्टला केसांवर तसेच राहू द्या. आठवड्यातून ३ वेळा केसांवर हा प्रयोग केल्याने पांढरे केस काळे होण्यास सुरुवात होईल. यामुळे केसांना नैसर्गिक चमकही मिळते. केसांवर काळ्या मिरीचा वापर केल्याने केसांना नैर्सर्गिकरित्या पोषण मिळते. नैसर्गिक उपायांच्या या मदतीने केसांचा पोट सुधारतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






