चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफ घेण्याच्या पाण्यात मिक्स करा 'हे' पदार्थ
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअर रुटीन तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. वारंवार क्लीनअप, फेशिअल करून त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. पण तरीसुद्धा त्वचा आहे तशीच राहते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग काही केल्या लवकर बरे होत नाही. अपचन, शरीरात होणारे हार्मोनल बदल, ऍक्ने, चुकीचा आहार इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. सुंदर दिसण्यासाठी केवळ स्किन केअर प्रॉडक्ट आणि महागड्या ट्रीटमेंट नाहीतर त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. बऱ्याचदा त्वचेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि धूळ, माती, प्रदूषणामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा होऊन राहते. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. (फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या क्रीमचा किंवा लोशनचा वापर न करता दिवसभरातून एकदा चेहऱ्यावर वाफ घ्यावी. वाफ घेतल्यामुळे त्वचेला भरमसाट फायदे होतात आणि त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी वाफ घेणे हा अतिशय जुना आणि पारंपरिक उपाय आहे. वाफ घेतल्यामुळे त्वचेची छिद्र ओपन होतात आणि त्वचेत साचलेली घाण बाहेर पडून जाते आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो. त्वचा आतून खोलवर स्वच्छ करण्यासाठी वाफ घेणे हा उत्तम आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफेच्या पाण्यात कोणते पदार्थ मिक्स करून टाकावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
वाफ घेण्यासाठी सर्वप्रथम टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाण्यात संत्र्याची साल आणि बीटची साल घालून पाण्याला उकळी काढा. त्यानंतर टोप खाली उतरवून टॉवेल घेऊन गरम पाण्याची वाफ घ्या. वाफ घेताना संपूर्ण चेहरा झाकून घ्या, यामुळे वाफ बाहेर जाणार नाही. वाफ घेताना संपूर्ण शरीराची योग्य काळजी घ्यावी. वाफ घेऊन झाल्यानंतर जाडसर टॉवेलने चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकून पडलेली घाण स्वच्छ होईल आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल.
नियमित गरम पाण्याची वाफ घेतल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल. तसेच त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी वाफ घेतल्यानंतर क्लीनअप पिनच्या साहाय्याने त्वचा स्वच्छ करून घ्यावी. संत्र्याच्या सालीमध्ये आणि बीटच्या सालीत त्वचेस आवश्यक असलेले सर्व गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे त्वचेला थेट विटामिन मिळतात. यामुळे त्वचा अतिशय जलद गतीने उजळदार होण्यास मदत होते. याशिवाय आठवडाभरात त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल. चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी नियमित वाफ घ्यावी. बीटच्या सालीमधील गुणधर्मांमुळे चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येईल.






