खोकला येतो मग दुर्लक्ष नको!
साधारण पणे फुप्फुस आणि श्वासननलिकेत एखादा अडथळा निर्माण झाल्यास त्याचा प्रतिक्रिया म्हणून खोकला येत असता.तो अडथळा खोकल्याच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. खोकल्याची अनेक कारणे असू शकतात; मात्र दीर्घकाळासाठी राहणारा खोकला हा गंभीर आजाराचे कारण ठरू शकतो. त्यामुळे खोकल्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. लहान मुले, मध्यम वयोगट आणि ज्येष्ठ नागरिकांना असणाऱ्या खोकल्याचे निदान वेगवेगळे असू शकते. सर्वच वयोगटातील मंडळींना सरसकट सगळी औषधे लागू होत नाहीत. खोकला हा प्राथमिक आजार असल्याने तो घरगुतीदेखील करता येतो.
आपल्याकडे खोकल्यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतीचादेखील प्रभावीपणे वापर केला जातो. औषध घेण्यापेक्षा आराम करून, गरम पाणी पिऊन, फिरायला जाताना तोंडावर रुमाल बांधणे यासारख्या गोष्टीचे पालन केले पाहिजे, तर प्रदूषणापासून आणि संसंर्गापासून आपल्या शरीराचे रक्षण छाती होते. शहरात प्रचंड प्रदूषण वाढल्याने गाड्यापासून निघणारा धूर, रस्त्यावरची धूळ यामुळे खोकल्याचे प्रमाणही तितकेच वाढले आहे. सततच्या वातावरण बदलामुळे देखील खोकल्या आंमत्रण दिले जाते.
या कारणांने होतो खोकला
खोकल्याची अनेक कारणे असू शकतात. त्यात लोअर रेस्पिरेटरी इफेक्शन, धूर किंवा धूळ नाकात जाणे, अनेक प्रकारच्या अॅलर्जी अस्थमा किंवा क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसिज (सीओपीडी) आदीचा समावेश आहे. याशिवाय या शरीराचे रक्षण छातीत जळजळ होणे किंवा चूर, रस्त्यावरची अॅसिड रिफ्लक्स, गॅस्ट्रोइसोफैगल, सतत रिप्लक्स डिसिज, औषधाचे साईड इफेक्ट, व्हूपिंग कफ, हार्ट फेलियर आदी गंभीर बाबी खोकल्याशी संबंधित असू शकतात.
खोकला हा रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकतो. त्याचबरोबर बहुतांश खोकला हा ओपाआप कमी होतो. बराच काळ खोकला कायम राहिला, तर डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेणेकरून खोकल्यामागचे कारण शोधून त्याच्यावर उपचार करता येतील.