चमकदार त्वचेसाठी प्या अळशीच्या बियांचे पाणी
त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात.बाजारात मिळणारी महागडी उत्पादने, घरगुती उपाय, केमिकल ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण याचा फार काळ आपल्या चेहऱ्यावर प्रभाव दिसत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्याच्या किरणांमुळे आणि पावसाळ्यात वातावरणातील आद्र्रतेमुळे त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते. चेहरा काळा पडू लागतो. चेहरा निस्तेज झाल्यानंतर अनेक उपाय केले जातात. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी शरीराला आतून पोषण देणे फार महत्वाचे असते.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी नुसत्या क्रीम्स वापरून चालत नाही. तर यासाठी आहारात योग्य त्या पोषक घटकांचे सेवन करणे गरजेचे आहे. सर्वच घरांमध्ये अळशीच्या बिया असतात. या बियांपासून खीर बनवली जाते. पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या अळशीच्या बियांचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा ३ फॅटी असिड आढळून येते, जे त्वचेला आतून पोषण देण्यास मदत करते. अळशीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मासिक पाळीत ‘अश्या’ प्रकारे घ्या स्वच्छतेची काळजी
चमकदार त्वचेसाठी प्या अळशीच्या बियांचे पाणी
अळशीच्या बियांमध्ये फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन आणि फायटोअॅस्ट्रोजन यांसारखे अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे त्वचेक पोषण मिळते. सर्व गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या बियांचे सेवन केल्यास त्वचा उजळण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत येतो.
अळशीच्या बिया पाण्यात भिजत ठेवून तुम्ही त्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी एक ग्लास पाण्यात २ चमचे अळशीच्या बिया टाकून भिजत ठेवा. या पाण्यावर झाकण ठेवा. रात्रभर पाण्यात अळशीच्या बिया भिजल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. या पाण्याने त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल. अळशीच्या बियांचे पाणी प्यायल्याने स्किन डिटॉक्स होते. तसेच या पाण्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे आढळून येतात. त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा एकदा परत मिळवण्यासाठी अळशीच्या पाण्याचा वापर करा.