Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 10 मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, वाचा रेसिपी

सकाळच्या नाश्त्याला झटपट काय बनवावे ते सुचत नाहीये? मग हा काही मिनिटातच तयार होणारा चविष्ट पदार्थ जरूर करून पहा. ही एक सोपी रेसिपी आहे जी घरात नेहमीच उपलब्ध असलेल्या साहित्यांपासून बनवली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 05, 2024 | 12:48 PM
अवघ्या 10 मिनिटांत बनवा सकाळचा नाश्ता, वाचा रेसिपी
Follow Us
Close
Follow Us:

सकाळच्या कामाच्या घाईगडबडीत अनेक गृहिणींना सकाळचा नाश्ता लवकर कसा बनवता येईल असा प्रश्न पडत असतो. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी सकाळच्या नाश्त्याची एक सोपी आणि झटपट तयार होणारी एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही पराठा तर बऱ्याचदा वेगवेगळेया गोष्टींचा खाल्ला असेल मग तो आलू पराठा असूदेत किंवा पनीर पराठा, पण तुम्ही कधी रव्याचा पराठा खाल्ला आहे का? अनेक लोकांनी आजपर्यंत रव्याचा कुरकुरीत पराठा ट्राय केला नसावा म्हणूनच आज आम्ही याची खास आणि चविष्ट अशी रेसिपी सांगणार आहोत.

ही रेसिपी अगदी कमी वेळेत तयार होते त्यामुळे तुमचा सकाळचा अमूल्य वेळ वाया जाणार नाही. तुम्ही ऑफिस पर्सन असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. पाहुयात यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.

[read_also content=”हॉटेलसारखी तडका खिचडी बनवा घरी, बोटं चाटत खाल इतकी होईल चविष्ट सोपी रेसिपी https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-make-restaurant-style-tadka-khichdi-recipe-at-home-542991.html”]

साहित्य:

  • रवा (रवा) – 1 कप
  • गव्हाचे पीठ – 1/2 कप
  • आले पेस्ट – 1/2 टीस्पून
  • चिरलेली हिरवी मिरची – 1 टीस्पून
  • सेलेरी – 1/4 टीस्पून
  • जिरे पावडर – 1/2 टीस्पून
  • हिरवी कोथिंबीर चिरलेली – 2 चमचे
  • काश्मिरी लाल मिरची – 1/4 टीस्पून
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • मीठ – चवीनुसार
कृती:
  • रव्याचा कुरकुरीत पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवा. त्यानंतर या कढईत 2 काप पाणी टाकून गरम होऊ द्या
  • नंतर पाण्यात १ चमचे तेल आणि एक चतुर्थांश चमचे मीठ टाका आणि या पाण्याला नीट उकळू द्या. पाणी उकळू लागले की यात रवा टाका
  • आता रव्याला यात नीट मिक्स करत राहा
  • लक्षात ठेवा यात गाठी पडून देऊ नका आणि याला तोपर्यंत मिक्स करत राहा जोपर्यंतच रवा पूर्ण पाणी शोषून घेत नाही
  • रवा नीट शिजला की गॅस बंद करा आणि तयार रव्याचे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या. आता हा रवा जेव्हा थोडा थंड होईल तेव्हा यात गव्हाचे पीठ, जिरे, सेलेरी आणि इतर सर्व साहित्य घालून मिक्स करून याचे पीठ मळून घ्या
  • त्यानंतर गॅसवर तवा ठेवा आणि दुसऱ्या बाजूला तयार पिठाचे गोळे तयार करून याचे पराठे लाटायला सुरुवात करा
  • पराठा तव्यावर टाका आणि तेल किंवा घी लावून याला दोन्ही बाजूने छान तपकिरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या
  • अशा प्रकारे तुमचा राव पराठा तयार होईल. हा पराठा तुम्ही दहीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
 

Web Title: Easy and quick breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 12:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.