दातांच्या आरोग्यासाठी कडुलिंब प्रभावी
मागील अनेक वर्षांपासून कडुलिंबाच्या पानांचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. या पानांमध्ये असलेली गुणधर्म आरोग्य, केस, त्वचा इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी वापरले जातात. कडुलिंबाच्या पानांत बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आढळून येतात. शिवाय यामध्ये दाहक-विरोधी, बुरशीविरोधी आणि विषाणूविरोधी गुणधर्म आढळून येतात, जे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जातो. या पानांचे अनेक वेगवेगळे फायदे आहेत, चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
काहींना सतत गोड किंवा चिकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण नेहमी नेहमी गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांच्या हिरड्यांना सूज येते. तसेच दातांना कीड लागणे, दातांमध्ये पोकळी निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे दातांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. दात नेहमी स्वच्छ ठेवावे. दातांना कीड लागले असे किंवा दातांवर पिवळा थर साचून राहील अशा पदार्थांचे सेवन करू नये.
हिरड्यांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. यामुळे हिरड्या स्वच्छ आणि मजबूत होतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे दातांच्या हिरड्या स्वच्छ होतात. मागील अनेक वर्षांपासून दातांच्या उपचारामध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जात आहे. कडुलिंबाची पाने हिरड्यांमध्ये होत असलेली जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतात. शिवाय ही पाने दातांमधील कीड नष्ट करून दात स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. दातांचे संसर्ग शरीरात निर्माण झालेल्या पोषणाच्या कमतरतेमुळे सुद्धा उद्भवू शकतात.
तोंडयाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. तोंडाची स्वच्छता न ठेवल्यास दात आणि हिरड्या दोन्ही खराब होण्यास सुरुवात होते आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे तोंडाच्या आणि श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाचे पाणी किंवा तेल लावावे. यामुळे दात आणि हिरड्या स्वच्छ राहतात. शिवाय तोंडातील दुर्गंधी सुद्धा कमी होते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सुद्धा केला जातो. पिंपल्स, मुरूम, डाग, फोड आल्यानंतर कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावली जाते. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि चेहरा उजळदार दिसू लागतो. डाग विरहित त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. शिवाय अंगाला खाज आल्यानंतर कडुलिंबाच्या पाण्याची अंघोळ केली जाते.