पित्ताच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या समस्यांमुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पोटात गॅस, ऍसिडिटी किंवा जळजळ वाढू लागल्यानंतर मळमळ किंवा डोकं दुखण्यास सुरुवात होते. अशावेळी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतात. मात्र अपचनाच्या समस्येवर घरगुती उपाय करूनसुद्धा आराम मिळवता येतो. यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते आणि आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया अपचन किंवा जळजळ झाल्यास कोणत्या पेयांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
पित्त किंवा ऍसिडिटीची समस्या उद्भवू लागल्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावा. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. लिंबामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे पचनाचा त्रास होत नाही. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी या पाण्याचे सेवन करावे. लिंबाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करतात, ज्यामुळे पोट स्वच्छ होते आणि जळजळ कमी होते. नियमित लिंबू पाण्याचे सेवन केल्यास पोटावर वाढलेली अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होईल.
जेवण बनवताना फोडणी देताना जिऱ्याचा वापर केला आहे. आरोग्यासाठी जिरं अतिशय प्रभावी आहे. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा जिरं टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर जिऱ्याचे पाणी गाळून पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.
अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवू लागल्यानंतर आलं आणि मधाचे सेवन करावे. यामुळे गॅसची समस्या कमी होऊन जळजळ कमी होते. कोमट पाण्यात आलं किसून त्यात मध टाकून प्या. यामुळे पोटातील साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवून देण्यासाठी आलं अतिशय गुणकारी आहे. मध खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
कोमट पाण्यात चिमूटभर हळद टाकून प्यायल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. शिवाय यामुळे शरीर डिटॉक्स होईल. अपचनाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पोटातील गॅसची समस्या कमी होते.