चॉकलेट
जगभरातील सर्वच महिलांना मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. या दिवसांमध्ये पाठ दुखी, कंबर दुखी, पाय दुखणे ,ब्लोटिंग, पिरियड क्रॅम्प्स, मूड स्विंग्स होणे इत्यादी समस्या मासिक पाळी दरम्यान जाणवू लागतात. पोट दुखी वाढल्यामुळे महिलांना अनेकदा घरी आराम करावा लागतो. हा त्रास कितीही काही केलं तरीसुद्धा कमी होत नाही. मासिक पाळी दरम्यान महिलांना काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते.(फोटो सौजन्य-istock)
शरीरातील हार्मोनल बदलांचा परिणाम मानसिक आरोग्यावर सुद्धा होतो. हार्मोनल बदलांमुळे अनेकदा मासिक पाळीमध्ये महिलांना जास्त प्रमाणात पोट दुखी किंवा कंबर दुखी जाणवते. हार्मोनल बदल झाल्यानंतर अनेकदा महिलांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मासिक पाळी दरम्यान शरीरातील कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स कमी होऊ लागते. ही कमतरता भरून काढण्यासाठी चॉकलेटचे सेवन केले जाते. अनेकदा डॉक्टर देखील मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात. या दिवसांमध्ये चॉकलेट खाण्याची इच्छा का होते?असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना. चहा तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये डार्क चॉकलेट खाल्ल्याने पाळीच्या वेदना कमी होतात. तसेच यामध्ये कोको बीन्स आढळून येतात. चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्सचा चांगला स्रोत असतो. संशोधनात असे समोर आले आहे की, मासिक पाळीच्या चार दिवस आधीच ते संपेपर्यंत महिलांना चॉकलेट खाण्याची इच्छा होते. 28.9 टक्के महिलांनी मासिक पाळीच्या वेळी चॉकलेट खाण्याची इच्छा होते असे स्पष्ट सांगितले आहे.
चॉकलेटचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक गुणकारी फायदे होतात.यामध्ये सेरोटोनिन, एंटीडिप्रेसेंट असते ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने फ्लेव्हनॉल मूड सुधारतो. मासिक पाळीमधील तणाव कमी करण्यासाठी चॉकलेट मदत करते. चॉकलेटमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आढळून येतात.