सप्लिमेंट्स घेण्याची गरज न पडता नैसर्गिक पद्धतीने शरीरात विटामिन डीची कमतरता भरून काढता येते. आजच्या बदलत्या जीवनशैलीत लोक जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये बसून काम करतात, त्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश शरीराला मिळत नाही. याशिवाय अनियमित आहार, व्यायामाचा अभाव आणि धावपळीची दिनचर्या यामुळे अनेकांमध्ये विटामिन डीची कमतरता दिसून येते. हे जीवनसत्त्व हाडांना मजबूत करण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, स्नायूंना बळकट करते तसेच मन:स्थिती संतुलित ठेवण्याचे काम करते. यासाठी काही सोपे नैसर्गिक उपाय अवलंबणे आवश्यक आहे.
संध्याकाळ होईल स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सूर्यप्रकाश सर्वाधिक प्रभावी असतो. या वेळी रोज केवळ १५ ते २० मिनिटे हात, पाय, चेहरा आणि पाठीवर थेट सूर्यकिरण पडू दिल्यास शरीरात नैसर्गिकरीत्या विटामिन डी तयार होते. आहारात काही पदार्थांचा समावेश करणेही महत्त्वाचे आहे. साल्मन, मॅकेरल, टूना आणि सार्डिन यांसारख्या फॅटी माशांमध्ये चांगल्या प्रमाणात विटामिन डी असते. अंड्याची जर्दी हा देखील उत्तम स्त्रोत आहे, मात्र हे जीवनसत्त्व केवळ जर्दीत आढळते, पांढऱ्या भागात नसते. दूध, दही, संत्र्याचा रस, सीरियल्स आणि छाछ यांसारख्या अनेक फोर्टिफाइड पदार्थांमध्ये अतिरिक्त विटामिन डी मिसळलेले असते.
Horror Story : आंब्याला गेलो! दरीतुन कुणी तरी हाक मारू लागलं… झाड तोडत ‘तो’ आला; एक भयाण आकृती
शाकाहारींसाठी मशरूम हा सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय आहे, कारण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मशरूममध्ये देखील विटामिन डी तयार होते. व्यायाम थेट विटामिन डी वाढवत नाही, मात्र शरीरात पोषक तत्वांचे शोषण करण्याची क्षमता वाढवतो. सकाळी धावणे, चालणे किंवा सायकल चालवणे यामुळे व्यायामासोबत सूर्यप्रकाशाचाही लाभ मिळतो. योग व ध्यान तणाव कमी करून शरीरात पोषण शोषणाची प्रक्रिया सुधारतात. या सर्व नैसर्गिक उपायांनी शरीराला पुरेसं विटामिन डी मिळू शकतं आणि सप्लिमेंट्स घेण्याची वेळ टाळता येते.