भाजीपासून ते मंचुरियनपर्यंत कोबी ही भाजी अनेक प्रकारे वापरली आणि खाल्ली जाते. कोबी ही भाजी अनेकांच्या आहारातील एक मुख्य भाग बनली आहे. घरच्या जेवणात कधी ना कधी कोबीचा समावेश हा असतोच. त्यांचबरोबर अनेकांना हा कोबी खायला आवडत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का? या कोबीचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात. कोबीची भाजी खाल्ल्याने तुम्हाला काय व किती फायदे मिळतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेक तज्ज्ञांद्वारे कोबीचे वेगवेगळे फायदे सांगण्यात आले आहेत. पचनास मदत करण्यापासून ते अनेक आजार दूर करण्यापर्यंत कोबीचाअनेक प्रकारे फायदा होत असतो. त्यामुळेच तुमच्या जेवणात कोबीचा समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरू शकते.
आतड्यांसाठी कोबीचे फायदे
कोबीमध्ये अनेक फायबर्स आढळले जातात ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास याचा मदत होत असतो. यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद येथील वरिष्ठ सल्लागार डॉ दिलीप गुडे यांनी आपल्या रोजच्या आहारात अर्धा ते तीन चतुर्थांश कप शिजवलेला कोबी किंवा दीड कप कच्चा कोबीचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. गुडे सांगतात की, कोबीमधील फायबर मल निर्माण करण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातल घातक घटक बाहेर पडले जातात. आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. याव्यतिरिक्त, कोबीमधील काही फायबर प्रीबायोटिक्स म्हणून कार्य करतात, जे तुमच्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना आहार देतात. यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढू शकते.
[read_also content=”सकाळी नाश्त्याला काय बनवायचे ते सुचत नाहीये? मग घरी बनवा पौष्टिकतेने भरपूर हरभरा बीट कटलेट https://www.navarashtra.com/lifestyle/dont-know-what-to-make-for-breakfast-in-the-morning-then-make-nutritious-gram-beet-cutlets-at-home-534404.html”]
व्हिटॅमिन पॉवरहाऊस
कोबीमध्ये अनेक जीवनसत्वे आढळली जातात. यातील व्हिटामिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. कोबीमध्ये व्हिटॅमिन के देखील आहे, जे रक्ताच्या गुठळ्या थांबवण्यासाठी मदत करते. कोबीमधील बी जीवनसत्त्वेही आढळलेले जाते, जे चयापचय आणि मज्जासंस्थेच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
वजनावर नियंत्रण
कोबी ही एक कमी कॅलरी आणि कमी चरबीयुक्त भाजी आहे. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे असेल, त्यांच्यासाठी कोबी हा एक उत्तम पर्याय आहे. कोबीमधील फायबर जास्त काळ पोट भरल्याचे भासवते ज्यामुळे खाण्याचे प्रमाण कमी होऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. डॉ. गुडे यांनी स्पष्ट केले की प्रत्येकी एक कप कोबीमध्ये एकूण ३३ कॅलरीज व उच्च फायबर असतात. म्हणूनच कोबीची भाजी आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि बद्धकोष्ठता आणि जळजळ रोखण्यात मदत करू शकते.
कोबीचे सेवन कुणी टाळावे?
लक्षात ठेवा, कोबीचे जरी फायदे होत असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्रास होण्याची शक्यता असते. डॉ गुडे यांनी विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. विशेषतः Hypothyroidism असलेल्या लोकांनी कोबी टाळावा कारण त्यामुळे थायरॉक्सिन हॉर्मोन्सच्या (Thyroxine hormones) निर्मितीमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी देखील सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण उच्च फायबरमुळे हायपोग्लाइसेमिया (Hypoglycemia) स्थिती उद्भवू शकते.