डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी किवीचे करा सेवन
डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पण काही लोक याकडे दुर्लक्ष करतात. सतत मोबाईल पाहिल्यामुळे, तासनतास लॅपटॉप पाहत राहिल्यामुळे, किंवा कामाचा अतिरिक्त ताण घेतल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होऊ लागते. डोळ्यांचे आरोग्य बिघडल्यानंतर हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमी होऊन जाते. डोळ्यांची दृष्टी कमी झाल्यानंतर चष्मा लावावा लागतो. पण काहींना चष्मा लावायला आवडत नाही. नेहमी नेहमी चष्मा लावणे काहींना आवडत नाही. अशावेळी अनेक लोक लेन्स लावतात. पण लेन्स लावल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांवरील चष्मा कायमचा काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या औषधी फळाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या फळाचे नियमित सेवन केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते आणि चष्म्याचा नंबर कमी होऊन जातो. (फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डोळ्यांची कमी झालेली दृष्टी सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात किवीचे सेवन करावे. यामुळे आरोग्यालासुद्धा अनेक फायदे होतात. किवीमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. शिवाय यामध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होत नाही. तासनतास स्किन पाहणाऱ्या लोकांनी आहारात किवीचे सेवन करावे. यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. डोळ्यांवरील तणाव नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात किवीचे सेवन करावे. शिवाय या फळाच्या सेवनामुळे डोळ्यांचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते.
किवीमध्ये लुटेन आणि झिझँथिन मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे डोळ्यांचे नुकसान होत नाही. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे घटक अतिशय महत्वाचे आहेत. मॅक्युलर डिजनरेशन आणि कॅटरॅक्टसारख्या डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी किवी मदत करते. डोळ्यांचे सूर्यकिरणांपासून नुकसान होऊ नये म्हणून किवीचे सेवन करावे.
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी किवीचे करा सेवन
डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तभिरण सुधारण्यासाठी किवी खावी. किवीचे सेवन केल्यामुळे डोळ्यांमधील रक्तप्रवाह सुधारून रक्तभिसरण चांगले होते. डोळ्यांना योग्य प्रकार पोषण मिळते. डोळ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन आहारात एक किवीचे सेवन करावे. यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतील.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
इतर फळांप्रमाणे किवीमध्ये सुद्धा पोटॅशियम, विटामिन ई, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे अनेक घटक आढळून येतात. हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. डोळ्यांच्या काजोरीवर मात करण्यासाठी आहारात किवी आणि गाजराचे सेवन करावे. यामुळे डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारते आणि चष्मा कमी होतो.