आरोग्याच्या दृष्टीने अंड खाणे अतिशय फायदेशीर आहे. अंड खाल्यामुळे शरीराला आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नियमित २ अंडी खाल्यास शरीरातील कमी झालेले कॅल्शियम वाढण्यास मदत होते. पण लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा अंड्यामधील पिवळा बल्क खायला आवडत नाही. शिवाय अनेक लोक आहारात अंड्यामधील पिवळ्या बल्कचे आहारात सेवन करत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अंड्यांमधील पिवळा बलक का खाऊ नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
अंड्यातील पिवळा बल्क का खाऊ नये?
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक अंड्यांचे सेवन करतात. अंड्यामध्ये प्रोटिन प्रमाणेच कॅल्शियम सुद्धा आढळून येते. 100 ग्रॅम उकडलेल्या अंड्यातील सफेद भागात 52 कॅलरी असतात.
वजन कमी करताना तुम्ही अंड्यांचा पांढरा भाग खाऊ शकता. हा भाग जास्त पौष्टिक असून यामध्ये कमी कॅलरीज असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी अंड अतिशय फायदेशीर आहे.
अंड्यामध्ये दोन भाग आढळून येतात. हेल्दी फॅट्स, विटामिन , मिनरल्स इत्यादी पौष्टिक घटक अंड्यांमध्ये आढळून येतात. अंड्याच्या सफेद भागात पिवळ्या बलकाच्या तुलनेत कमी प्रोटीन आढळून येते.
अंड्याच्या सफेद भागात कमी फॅट्स आढळून येतात. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अंड खाणे हा उत्तम पर्याय आहे. अंड्याच्या पिवळ्या बल्कमध्ये जास्त प्रोटीन आढळून येते.
पांढऱ्या भागामध्ये विटामिन, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स आढळून येतात.