बदाम(Almonds) हे एक ड्रायफ्रूट आहे. बदामाचा वापर गोड पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होऊन स्मरणशक्ती वाढते. लहान असताना आपली आई नेहमी ४ ते ५ भिजवलेले बदाम रोज खाण्यासाठी द्याची. भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला फायदे होतात असे आपल्याला नेहमीच सांगितले जायचे.तुम्ही देखील पाण्यात भिजवलेले बदाम खाल्ले आहेत का? पण बदामाच्या तेलात भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला जास्तीत फायदे होतात. दररोज १० ते १२ बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तर पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए, व्हिटॅमिन इ यांसारखे घटक आढळून येतात. मात्र भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात.जाणून घेऊया सविस्तर..
भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात?
पोषक तत्वांचा चांगला स्रोत:
बदामच्या सालीमध्ये एक विशेष गुणधर्म आढळून येतो ज्याला फायटिक ऍसिड असे म्हणतात. फायटिक ऍसिड पोषकद्रव्ये योग्यरित्या शोषून घेण्यास मदत करतात. तसेच बदाम पाण्यात भिजत ठेवल्याने त्याचे प्रमाण कमी होत जाते, आणि शरीराला पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत होते.
[read_also content=”उन्हाळ्यात थंडगार लस्सी प्यायल्याने शरीराला होतात आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-benefits-of-drinking-lassi-in-summer-538937.html”]
वजन कमी होण्यास मदत होते:
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेकजण जिम किंवा महागडा डाएट घेतात. पण काहीवेळा त्याचा शरीरावर फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रोजच्या आहारात बदामाचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बदामामध्ये फायबर असल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही. तसेच बदाम पाण्यात भिजवल्यानंतर ते मऊ झाल्यानंतर सहज साल काढून आपण ते खाऊ शकतो.
साखरेची पातळी नियंत्रित राहते:
बदाममध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.मधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांनी आहारात बदामांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील साखर हळूहळू कमी होतो.
हृदयाचे आरोग्य सुधारते:
हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी बदाम उपयुक्त आहेत. हेल्दी फॅट्समुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. तसेच बदामांमध्ये मुबलक प्रमाणात फॅट आढळून येतात. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी बदाम फायदेशीर आहेत. हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी बदामाचे सेवन केले पाहिजे.
[read_also content=”तेलकट पदार्थ खाऊन पोट खराब करण्याऐवजी आहारात करा ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचे सेवन https://www.navarashtra.com/lifestyle/healthy-food-for-evening-snack-in-summer-538967.html”]
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर:
बदाम हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यामध्ये असलेल्या फ्री रॅडिकल्समुळे शरीराचे कमी नुकसान होते. तसेच यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा लवकर दिसून येत नाहीत. तसेच केसांच्या आरोग्यसाठी उपयुक्त असलेले बायोटिन बदामामध्ये आढळते.