Eye Care Tips: तुम्हालाही चष्मा वापरायचा कंटाळा आलाय का, मग हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
चष्ना लागू नये किंवा चष्म्यापासून लवकर सुटका व्हावी यासाठी आयुर्वेदात काही प्रभावशाली उपाय सांगितले आहेत.
त्राटक साधना: ही साधना म्हणजे एका अर्थी डोळ्यांचा व्यायामच आहे.त्राटक साधनेमध्ये एका बिंदूला लक्ष्य केंद्रीत करुन 15 मिनिटं नजर स्थिर ठेवली जाते. या सरावामुळे नजरदोष हळूहळू कमी होतो. व डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते.
नेत्र धौति: सतत बाहेरच्या प्रदुषणमामुळे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या संपर्कामुळे डोळे जळजळणं किंवा लाल पडणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे या त्रासावर नेत्र धौति उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना डोळे थंड पाण्यानी स्वत्छ धुवावेत याने डोळ्याती घाण निघून जाते आणि डोळ्याचं आरोग्य सुधारतं.
नेत्रतर्पण: जसं शरीराची मालिश करणं गरजेचं असंत तसंच डोळ्यांचा मसाज करणं ही महत्त्वाचं आहे. जर सतत डोळे कोरडे पडत असतील तर गायीच्या तुपाने हलक्या हाताने डोळ्यांचा मसाज करा. त्यामुळे डोळे तजेलदार होतात.
त्रिफळा चूर्ण : त्रिफळा चूर्ण पाण्य़ात टाका आणि त्याने डोळे धुवा असं केल्याने नजर सुधारते.
सुका मेवा : सुका मेवा आणि आवळा यांच्यात असलेल्या पौष्टिक घटकांमुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारते.
सर्वांगासन: रोज सकाळी सर्वांगासन केल्याने मेंदू आणि डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडतो आणि रत्कप्रवाह सुरळीत होतो.