गटारी स्पेशल: घरी बनावा हॉटेल स्टाइल ड्रॅगन चिकन
अखेर गटारीचा दिवस आलाच. आज नॉनव्हेज प्रेमींची पर्वणी! उद्यापासून श्रावण सुरु होणार आणि यामुळे अनेक नॉनव्हेज प्रेमी श्रावण सुरु होण्याच्या आदल्या दिवशी आपली नॉनव्हेज खाण्याची इच्छा पूर्ण करत असतात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी एक हटके नॉनव्हेज रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुमची गटारी आणखीनच मजेदार बनवेल. या रेसिपीचे नाव आहे ड्रॅगन चिकन. घाबरू नका, यात ड्रगनचा काहीही समावेश नाही तर हा चिकनपासून तयार केला जाणारा एक स्पायसी पदार्थ आहे. कुरकुरीत चिकन आणि त्यावर स्पायसी ग्रेव्ही यांचा संगम म्हणजे ड्रॅगन चिकन. हा पदार्थ चवीला अप्रतिम लागतो. हा पदार्थ अनेक हॉटेल्समध्ये सर्व्ह केला जातो मात्र आज आम्ही तुम्हाला हा पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
हेदेखील वाचा – पावसाळ्यात भजी नाही तर बनवा टेस्टी पोटॅटो बॉल्स! चव अशी की सर्वच होतील फिदा