Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी दही कबाब खाल्ले आहेत का? अवघ्या 15 मिनिटांत तयार होते रेसिपी

तोंडात टाकताच विरघळणारे दही कबाब कधी खाल्ले आहेत का? ही व्हायरल रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करायला हवी. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 14, 2024 | 10:31 AM
कधी दही कबाब खाल्ले आहेत का? अवघ्या 15 मिनिटांत तयार होते रेसिपी

कधी दही कबाब खाल्ले आहेत का? अवघ्या 15 मिनिटांत तयार होते रेसिपी

Follow Us
Follow Us:

कोणतीही पार्टी असली किंवा खास कार्यक्रम असला की स्नॅक्स हा येतोच. आता या स्नॅक्समध्ये बऱ्याच प्रकारचे पदार्थ ठेवले जातात. यातीलच एक प्रमुख पदार्थ म्हणजे कबाब. कबाब अनेक प्रकारचे बनवले जातात. यात व्हेज आणि नॉनव्हेज असेही ऑप्शन्स असतात. आता तुम्ही चिकन कबाब, मटण कबाब व्हेज असाल तर पालक कबाब, मिक्स व्हेज कबाब असे बरेच कबाब खाल्ले असतील मात्र तुम्ही कधी दही कबाब खाल्ले आहेत का? फार कमी लोकांनी हा पदार्थ चाखला असावा मात्र आम्ही तुम्हाला सांगतो याची चव फार अप्रतिम लागते.

बाहेरून क्रिस्पी आणि तोंडात जाताच विरघळणारे हे कबाब तुमच्या दिवसाची रंगत आणखीन वाढवतील. याची हटके रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांतच तयार होते, ज्यामुळे तुमचा फार वेळ वाया जाणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव आता घरीच बनवा, व्हायरल होतेय रेसिपी, त्वरित नोट करा

साहित्य

  • अर्धी वाटी दही (Hung Curd)
  • एक उकडलेला किसलेला बटाटा
  • 40 ग्रॅम किसलेले पनीर
  • एक चिरलेला कांदा
  • अर्धी चिरलेली सिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • उकडलेले स्वीट कॉर्न
  • लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला
  • ब्रेड क्रम्स
  • तेल

हेदेखील वाचा – रात्रीच्या शिळ्या चपातीपासून तयार करा कुरकुरीत चायनीज भेळ, जाणून घ्या रेसिपी

कृती

  • काहींचे कबाब तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात दही, किसलेला बटाटा, 40 ग्रॅम किसलेले पनीर, एक
  • चिरलेला कांदा, अर्धी चिरलेली सिमला मिरची, हिरवी मिरची आणि उकडलेले स्वीट कॉर्न घ्या
  • यानंतर यात चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घाला
  • मग यात एक चमचा कॉनफ्लोर पीठ घाला
  • आता सार्ह साहित्य व्यवस्थित मिक्स करा
  • तयार पिठाचा लहान भाग हातात घ्या आणि याला कबाबचा आकार द्या
  • तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हे कबाब तयार करू शकता
  • तयार कबाब ब्रेड क्रम्समध्ये बुडवा आणि तेलात सोडा
  • मध्यम आचेवर हे कबाब छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या
  • अशाप्रकारे तुमचे दही कबाब तयार होतील
  • तयार कबाब पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know social media viral dahi kabab recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 10:30 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
2

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
3

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
4

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.