Navratri Special : झटपट बनवा जाळीदार आणि मऊ उपवासाची इडली-चटणी
नवरात्रीचा उत्सव आता सुरु झाला आहे. यानिमित्त जागोजागी देवी दुर्गाचं आगमन होतं. लोक देवीची पूजा-अर्चा करत नऊ दिवस उपवास करतात. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध रुपांची पुजा आणि व्रत केले जाते. काहीजण फळ खाऊन तर काहीजण उपवासाचे पदार्थय खाऊन आपला उपवास पूर्ण करत असतात. उपवास म्हटलं की, तेच तेच उपवासाचे पदार्थ आठवू लागतात जसे की, साबुदाणा खिचडी, बटाट्याची उसळ… मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या पदार्थनाव्यतिरिक्त देखील असे अनेक पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आज आमही तुम्हाला उपवासाची इडली आणि चटणी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही इडली साबुदाणा आणि वरई यांचा वापर करून बनवली जाणार आहे. चला तर याची हटके रेसिपी जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – उरलेल्या चपातीपासून बनवा चायनीज स्टाइल नूडल्स, लहान मुलांच्या आवडीची रेसिपी
1 कप वरई
1/4कप साबुदाणा
1/2 कप दही
चवीनुसार सैंधव मीठ
1/2 चमचा इनो सोडा
हेदेखील वाचा – घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तंदूरी आलू, रेसिपीची चव चाखताच प्रत्येकजण होईल खुश