Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी घरीच तयार करा पिझ्झा पॉकेट, झटपट रेसिपी नोट करा

तुम्हाला फास्ट फूडचे खायला आवडत असेल तर पिझ्झा पॉकेट नावाचा पदार्थ तुम्ही नक्कीच खाल्ला असावा. लहान मुलांना विशेष करून हा पदार्थ फार आवडतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हा पदार्थ आता तुम्ही घरीदेखील बनवू शकता. अवघ्या 15 मिनिटांत तुम्ही हे पिझ्झा पॉकेट अगदी सहज घरी तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 13, 2024 | 11:07 AM
लहान मुलांसाठी घरीच तयार करा पिझ्झा पॉकेट, झटपट रेसिपी नोट करा

लहान मुलांसाठी घरीच तयार करा पिझ्झा पॉकेट, झटपट रेसिपी नोट करा

Follow Us
Close
Follow Us:

दररोज तेच तेच खाऊन लहानांनाच काय तर मोठ्यांनाही कंटाळा येत असतो. भाजी-चपाती, भात-डाळ हे पदार्थ तर आपण नेहमीच खात असतो मात्र या विकेंडला तुम्हालाही काही चटपटीत आणि टेस्टी खावेसे वाटत असल्यास तुम्ही आजची रेसिपी ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरीच सोप्या पद्धतीने पिझ्झा पॉकेट कसा बनवावा याची रेसिपी सांगणार आहोत.

तुम्हाला फास्ट फूड खायला आवडत असेल तर तुम्हाला पिझ्झा पॉकेट हा पदार्थ नक्कीच माहिती असावा. बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये चिजी मसालेदार स्टफिंगने भरलेला पिझ्झा पॉकेट चवीला अप्रतिम लागतो. लहान मुलांना तर ही रेसिपी फारच आवडेल. काही तरी नवीन म्हणून तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता. मुख्य म्हणजे, ही रेसिपी बनवण्यासाठी फार साहित्य किंवा वेळेची गरज भासत नाही. ही रेसिपी अगदी कमी वेळेत झटपट तयार होते. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – रात्रीची उरलेली डाळ फेकू नका तर त्यापासून बनवा टेस्टी पराठे, ही रेसिपी फॉलो करा

साहित्य

  • 2 चमचे मका
  • 2 मोठे चमचे बारीक चिरलेला कांदा
  • 2 चमचे शिमला मिरची
  • टोमॅटो सॉस
  • ब्रेड स्लाइस (गरजेनुसार)
  • 1-2 चमचे बटर
  • 3-4 ऑलिव्ह
  • किसलेला मोझरेला चीज (गरजेनुसार)
  • पिझ्झा सॉस (गरजेनुसार)
  • मीठ (चवीनुसार)
हेदेखील वाचा – आता घरीच बनवा KFC स्टाइल चिकन, नोट करा रेसिपी

कृती

  • पिझ्झा पॉकेट बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर पॅन ठेवा आणि त्यावर बटर टाका
  • आता यात कांदा टाकून छान परतून घ्या
  • यानंतर यात मका, शिमला मिरची आणि मीठ टाका आणि सर्व भाज्या नीट शिजवून घ्या
  • भाज्या शिजून नरम झाल्या की यात पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस टाका आणि मिक्स करा
  • आता तुमची पिझ्झा पॉकेटची स्टफिंग तयार आहे
  • ही स्टफिंग एका प्लेटमध्ये काढा आणि यात मोझेरेला चीज आणि ऑलिव्ह टाकून मिक्स करा
  • आता ब्रेड स्लाइस घ्या आणि त्याच्या कडा कापून घ्या
  • आता एक ब्रेड स्लाइस घ्या घ्या आणि त्यावर तयार स्टफिंग टाका आणि रोल करून पॉकेट तयार करा
  • दुसरीकडे गॅसवर कढई ठेवून यात तेल गरम करत ठेवा
  • तेल गरम झाले की तयार पॉकेट यात टाकून मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या
  • तयार पिझ्झा पॉकेट एका प्लेटीत काढा आणि सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Try pizza pocket recipe easy to make

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 11:07 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.