बाजारातील इडली सोडा! आता घरीच बनवा सॉफ्ट आणि स्पॉंजी इडली, या स्टेप्स फॉलो करा
इडली हा एक नाश्त्याचा प्रकार आहे. देशभरात नाश्त्यासाठी इडली हा प्रकार हा फार लोकप्रिय आहे. तांदळाच्या पिठापासून तयार होणारा पदार्थ चवीला फार छान लागतो. ही एक दक्षिण भारतीय डिश आहे. दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशभरात हा इडली फार आवडली बनवली आणि खाल्ली जाते. जर तुम्हाला नाश्त्यात हलके आणि आरोग्यदायी काहीतरी खायचे असेल तर इडली हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. अनेकदा वजन कमी करण्यासाठीही इडलीचे सेवन फायद्याचे ठरते.
अनेकदा घरी इडली बनवायची झाली की, हवी तशी बनत नाही. इडली मऊ असणे फार गरजेचे असते मात्र बऱ्याचदा इडली मऊ होत नाही आणि त्यामुळे याची चवही बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी यासाठीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्ही घरच्या घरी बाजारात मिळते तशी टेस्टी आणि सॉफ्ट इडली बनवू शकता. प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्सने समृद्ध हा पदार्थ नाश्त्यासाठीचा एक उत्तम पदार्थ आहे. चला तर मग इडली बनवण्यसाठीचा एक सोपा मार्ग जाणून घ्या.
हेदेखील वाचा – Healthy Recipe: सकाळच्या नाश्त्याची चिंता सोडा, झटपट बनवा क्विनोआ उपमा
हेदेखील वाचा – पौष्टिकतेने भरपूर सकाळच्या नाश्त्याला बनवा दुधीचे कटलेट, काही मिनिटांतच तयार होते रेसिपी
या स्टेप्स फॉलो केल्यास, तुम्ही घरीच बाजारात मिळते तशी सॉफ्ट आणि मऊ इडली अगदी सहज तयार करू शकता. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही तयार इडलीला तडक देऊन यापासून मसाला इडलीदेखील तयार करू शकता. तसेच जे इडलीचे पीठ तुम्ही तयार केले आहे, ते पीठ तुम्ही आठवडाभर फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता.