
बुरशीजन्य आजारांपासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या आरोग्याची काळजी
वाढत्या गर्मीपासून आता मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. देशासह राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडत असल्याने सगळीकडे वातावरणात बदल झाला आहे. पण वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. पावसाळ्यामध्ये साथीच्या आजरांसोबतच बुरशीजन्य संसर्गा देखील वाढू लागतात. हे संसर्ग वाढू लागल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. हातापायांना सतत खाज येणे, पायाच्या बोटाला लागल्यानंतर जखम होणे, हातपाय लाल होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बुरशीजन्य संसर्गापासून आरोग्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजेत, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्याने पावसाळ्यात आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
बुरशीजन्य आजार टाळण्यासाठी सैल कपडे घालावे. पावसाळ्यातील आद्र्रतेमुळे जास्त प्रमाणात घाम येतो. घाम आल्यानंतर कपडे ओले होऊन अंगाला घामाचा वास येऊ लागतो. त्यामुळे पावसाळ्यात देखील सैल कपडे घालावे. सुती आणि सैल कपडे घातल्यामुळे जास्त प्रमाणात घाम येत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जाड कपडे घालणे टाळावे.
बुरशीजन्य आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा जेवणाआधी हात स्वच्छ धुतले पाहिजे. हात स्वच्छ न धुतल्यामुळे रोगजंतू हाता वाटे पोटामध्ये जातात. पोटामध्ये गेल्यानंतर पचनक्रियेसंबंधित समस्या जाणवू लागतात. त्यामुळे प्राण्याला स्पर्श केल्यानंतर किंवा साफसफाई केल्यानंतर लगेच हात स्वच्छ धुवावे. हात स्वच्छ धुतल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होऊन जातो.
पावसाळ्यात घरी जाताना किंवा बाहेर पाणी साचून राहते. या पाण्यातून मार्ग काढताना अनेकदा आपल्या पायाला किंवा इतर कुठेही दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे जखम किंवा दुखापत झाल्यास स्वतःवर उपचार करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केल्यास जखम लवकर बारी होते. अन्यथा बुरशीजन्य आजार वाढू शकतात.
बुरशीजन्य आजारांपासून वाचण्यासाठी ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
अंघोळ केल्याने अंग पुसण्यासाठी आपण टॉवेल वापरतो. हा टॉवेल न सुकवता किंवा कोरडा तसाच ठेवल्यामुळे बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. घाम आल्यानंतर आपण त्याच चादरीवर बसतो. त्यामुळे नियमित घरातील चादर आणि टॉवेल पाण्याने स्वच्छ केले पाहिजेत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.